नवी दिल्ली, 23 एप्रिल : सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. प्रसिद्धीसाठी लोक निरनिराळ्या गोष्टी करताना दिसतात. मजेशीर, विचित्र, भयानक, भावुक, स्टंट असे व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर गराळा घालताना दिसतात. अशातच आणखी एक भयानक स्टंट व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक एसयूव्ही पोलीस कारचा पाठलाग करत आहे मात्र गाडीचा स्टंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मर्सिडीज भरधाव वेगाने रस्त्यावर पळत आहे आणि कारमागे पोलिसांची गाडी त्यांचा पाठलाग करत आहे. तेवढ्यात मर्सिजडीज समोरच्या ट्रकला धडकते आणि दुसऱ्या साईडला जाऊन पडते. तरीही तो कारवाला ती गाडी घेऊन पळून जातो. एकंदरीत तो पोलीसांपासून पळत असल्याचं दिसत आहे. हा खतरनाक स्टंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Outplayed ✔ pic.twitter.com/ZyyykYAGcq
— 𝑾𝒐𝒓𝒍𝒅𝑾𝒊𝒅𝒆𝑪𝒂𝒓𝒔™ (@WorldWideCarsTM) July 30, 2020
दरम्यान, @WorldWideCarsTM नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही पहायला मिळत आहे. हा स्टंट पाहून सर्वच हैराण झाले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पोलिसांना पाठीमागून येताना पाहून जीप चालक अपघाताचा फायदा घेत कसा पळून जातो हे थक्क करणारं आहे.