मुंबई, 14 जुलै : चोर हे खूप हुशार असतात, ते चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लावतात. कधीकधीतर चोर अशा काही गोष्टी करतात की त्या हस्यास्पद असतात. एक असंच विचित्र प्रकरण हरियाणातील एका मंदिरातून समोर आली आहे. ही घटना जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. जी पाहून लोकांना धक्का बसला. खरंतर एका दानपेटीतून चोराने 5 हजार रुपये लुटने, पण लुटण्यापूर्वी त्या चोरानं जे केलं ते पाहून यावर काय म्हणावं हेच तुम्हाला सुचणार नाही. या चोराने ‘हनुमान चालिसा’ म्हटली, त्याने देवासमोर 10 रुपये अर्पण देखील केली आणि मग तेथून 5 हजारीची चोरी करुन पळून गेला. रेवाडीतील एका मंदिरातून एक अनोखी घटना समोर आली आहे. गुन्हा करण्यापूर्वी ‘हनुमान चालीसा’ पाठ करतानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. Viral Video : मस्करीची झाली कुस्करी, भुकेनं व्याकूळ मगरीसमोर मित्राला फेकलं आणि… सीसीटीव्ही फुटेजनुसार, हा माणूस भक्ताच्या वेशात हरियाणातील धरुहेरा शहरातील मंदिरात गेला. तो निष्पाप माणसासारखा देवाच्या पायाशी बसला आणि हनुमान चालिसा म्हणू लागला, नंतर तो देवाजवळ ठेवलेले पुस्तक वाचू लागला. तो भक्ताप्रमाणे वागतो आणि ‘हनुमान चालिसा’ म्हणतो तर इतर भक्त मंदिरात येऊन प्रार्थना करतात. एका पुजार्याला पाहून तो खिशातून 10 रुपयांची नोट काढतो आणि परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. दुचाकी चोरीसाठी चोरींनी वापरली अनोखी शक्कल, संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद काही मिनिटांनी आजूबाजूला कोणी नसताना, तो खोलीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नीट तपासतो, त्यानंतर तो दानपेटीतून मूठभर पैसे काढतो आणि पळून जाण्यापूर्वी कपड्यांमध्ये लपवतो. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून चोरट्याचा शोध घेतला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या फरार असलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. मात्र, हा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असल्याने चोरट्याने ज्याप्रकारे चोरी केली ते पाहून नेटिझन्सला धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.