मराठी बातम्या /बातम्या /Viral /आनंदाच्या भरात नवरदेवाने केलं असं काही...स्वतःच्याच लग्नाला जाऊ शकला नाही

आनंदाच्या भरात नवरदेवाने केलं असं काही...स्वतःच्याच लग्नाला जाऊ शकला नाही

लग्न

लग्न

लग्न म्हटलं की, विधी परंपरा आल्याच. याशिवाय बरीच मजा-मस्तीही आली. लग्नातील अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटनाही समोर येत असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 18 मार्च : लग्न म्हटलं की, विधी परंपरा आल्याच. याशिवाय बरीच मजा-मस्तीही आली. लग्नातील अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटनाही समोर येत असतात. आपण विचारही करु शकत नाही अशा घटना घडत असतात. याचे काही व्हिडीओही सोशल मीडियवर व्हायरल होताना दिसतात. अशातच लग्नातील आणखी एक घटना समोर आली असून याविषयी ऐकून तुम्हीदेखील हैराण व्हाल.

सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारी घटना लग्नातील विचित्र प्रकाराची आहे. या घटनेविषयी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तर ही घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण जिल्ह्यातील सुलतानगंजशी संबंधित आहे. सोमवारी येथून लगतच्या गावात लग्नाची मिरवणूक निघणार होती. मुलीच्या बाजूनेही पूर्ण तयारी केली होती आणि वधूही तयार होऊन मिरवणुकीची वाट पाहत होती, मात्र रात्र उलटूनही मिरवणूक आलीच नाही. नवरा मुलगा लग्नासाठी पोहोचलाच नाही.

हेही वाचा - पाणघोड्यांनी सिंहाची हवा केली टाईट, भरपाण्यातून सिंहाला ठोकावी लागली धूम, पाहा Video

असे सांगण्यात येत आहे की, नवऱ्या मुलाला लग्नाचा एवढा आनंद झाला की त्याने भरपूर मद्यपान केले. मद्यापान घेतल्यामुळे तो लग्नाची मिरवणुक न्यायलाच विसरला. रात्रभर वाट पाहूनही नवरदेव लग्नासाठी न आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. नवरदेवाच्या या कृतीमुळे त्याचेच घरचे त्याच्यावर संतापले. वधू पक्षाचे लोकही त्याच्यावर रागावले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी जेव्हा वराला शुद्ध आली तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी त्याला वधूच्या घरी जाऊन लोकांना त्याच्या घोटाळ्याबद्दल सांगण्यासाठी पाठवले. मात्र त्यानंतर संपूर्ण प्रकरण कळल्यानंतर वधूने लग्नास नकार दिला आहे. काही काळासाठी हे लग्न रद्द करून दोन्ही पक्षांमध्ये पैशांबाबत करार झाला.

हेही वाचा -  रस्त्याच्या मधोमध ओव्हरलोड ट्रॅक्टरचा जीवघेणा 'स्टंट', Video पाहून अंगावर येईल काटा

नवरदेव जेव्हा दुसऱ्या दिवशी सासरच्या घरी पोहोचला तेव्हा त्यालाही लोकांनी ओलीस ठेवले होते, त्यानंतर त्याने लग्नाच्या तयारीत जितके पैसे खर्च केले होते तितके पैसे वधूच्या कुटुंबीयांना परत केले. जेव्हा वधूला समजले की वर नशेत झोपला होता, तेव्हा तिने लग्नास नकार दिला, त्यानंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांनीही त्यास नकार दिला, याबाबत झी न्यूजने वृत्त दिले आहे.

दरम्यान, यापूर्वीही लग्नाविषयीच्या अनेक विचित्र घटना घडल्या आहेत. काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. असे व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होतात.

First published:

Tags: Top trending, Viral, Viral news, Wedding