जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्त्याच्या मधोमध ओव्हरलोड ट्रॅक्टरचा जीवघेणा 'स्टंट', Video पाहून अंगावर येईल काटा

रस्त्याच्या मधोमध ओव्हरलोड ट्रॅक्टरचा जीवघेणा 'स्टंट', Video पाहून अंगावर येईल काटा

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

रस्त्यावर अपघात घडण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. भररस्त्यात अनेक अपघात घडतात आणि यामध्ये अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 मार्च : रस्त्यावर अपघात घडण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. भररस्त्यात अनेक अपघात घडतात आणि यामध्ये अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागतो. याशिवाय रस्त्याच्या मधोमध अनेजकण जीवघेणा स्टंटदेखील करताना दिसतात. मात्र अशा स्टंटबाजीनं लोक आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक खतरनाक स्टंट व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. रस्ते अपघातांच्या बाबतीत भारत अनेक देशांच्या पुढे आहे. येथे रस्त्यावर खुलेआम नियमांची पायमल्ली केली जाते. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक रस्त्यावर स्टंट करताना दिसत आहेत. स्टंटबाजीमुळे आपला जीवही जाऊ शकतो, अशी भीती त्यांच्या मनात नाही. हे रील करणाऱ्यांचे युग आहे, त्यामुळे लोक लोकप्रिय होण्यासाठी विविध प्रकारची जोखीम पत्करतात. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक नवीन व्हिडिओ पाहा, ज्यामध्ये ट्रॅक्टरचा चालक स्टंट करताना दिसत आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओमध्ये, एक माणूस ऊसाने ओव्हरलोड ट्रॅक्टर चालवताना दिसतोय. ट्रॅक्टरमध्ये उसाचा ओव्हरलोड आहे, पण दिखावा करण्यासाठी त्या व्यक्तीने ट्रकचा पुढचा भाग हवेत उचलला आणि तोही थोडासाच नाही तर पूर्णपणे हवेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे स्टंट करण्याच्या मूडमध्ये आहे. एक छोटीशी चूक आपला जीव धोक्यात घालू शकते याची त्याला अजिबात भीती वाटत नाहीये. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, @MotorOctane नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट येताना दिसत आहे. हा खतरनाक स्टंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओवर सध्या लोक शॉकिंग प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात