नवी दिल्ली, 18 मार्च : सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राणी सिंहाला घाबरुन असतो. सिंह कधी कोणावर हल्ला करेल काही सांगता येत नाही त्यामुळे सर्व प्राणी त्याच्या भीतीमध्ये असतात. सिंह शिकारही भयंकरित्या करतो. सिंहाच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आले आहेत. अशातच सर्वांना धाक दाखवणाऱ्या सिंहाची पाणघोड्याने बिकट अवस्था केल्याचं पहायला मिळालं, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक सिंह नदीच्या मध्यभागी एका खडकावर आराम करताना दिसत आहे. ते पाहून पाण्यात असणारे पाणघोडे एक एक करून त्याच्या जवळ जातात. ज्यांना बघून असे वाटते की, त्यांच्या परिसरात सिंह पाहून सगळेच संतापले होते. त्यामुळे सर्वजण मिळून सिंहाच्या दिशेने चाल करु लागले आणि मग एका पाणघोड्याने हिंमत एकवटून नदीच्या मध्यभागी खडकावर झोपलेल्या सिंहावर हल्ला केला. पाणघोड्याचे धैर्य पाहून सिंहही घाबरला आणि क्षणात तेथून धूम ठोकली.
भीतीने सिंहाने पाण्यात उडी मारली. पण तिथेही त्याचा जीव सुटला नाही. तो नदीतून बाहेर पडेपर्यंत पाणघोड्याने त्याचा पाठलाग केला. तसे पाणघोडे हे अतिशय शांत प्राणी आहे. पण त्यांच्या क्षेत्रात दुसऱ्याचा प्रवेश केल्याचं पाहून ते संतापतात. हा व्हिडीओ यूट्यूब लेटेस्ट साईटिंग्सवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
दरम्यान, अनेकांना वन्य प्राण्यांविषयी जाणून घेण्यामध्ये जास्त रस असतो. त्यामुळे ते जंगल सफारी, पार्कमध्ये जातात. सोशल मीडियावरही अनेक प्राण्यांचे व्हिडीओ समोर येत असतात. यामध्ये कधी भयंकर, मजेशीर, विचित्र व्हिडीओ समोर येतात. नेटकरीही प्राण्यांच्या व्हिडीओंना चांगली पसंती देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lion, Shocking video viral, Top trending, Videos viral, Viral