जाहिरात
मराठी बातम्या / Viral / टेकडीवरुन 300 फूट खाली कोसळला पण मध्येच अडकला, तरुणाच्या बचावासाठी एअर फोर्सचे अथक प्रयत्न, VIDEO

टेकडीवरुन 300 फूट खाली कोसळला पण मध्येच अडकला, तरुणाच्या बचावासाठी एअर फोर्सचे अथक प्रयत्न, VIDEO

टेकडीवरुन 300 फूट खाली कोसळला पण मध्येच अडकला, तरुणाच्या बचावासाठी एअर फोर्सचे अथक प्रयत्न, VIDEO

नंदी टेकडीवर 19 वर्षीय तरुण डोंगरावरून 300 फूट खाली पडून मोठी दुर्घटना घडली. पडल्यानंतर तो तरुण मध्येच कुठेतरी अडकला आणि दरीत कोसळण्यापासून वाचला

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू 21 फेब्रुवारी : कर्नाटकातील नंदी टेकडीवर 19 वर्षीय तरुण डोंगरावरून 300 फूट खाली पडून मोठी दुर्घटना घडली. पडल्यानंतर तो तरुण मध्येच कुठेतरी अडकला आणि दरीत कोसळण्यापासून वाचला. जीव वाचल्यानंतर या तरुणाने बचावासाठी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. मात्र तिथे पोहोचूनही पोलीस या तरुणाला मदत करू शकले नाहीत आणि त्यांनी थेट हवाई दलाशी संपर्क साधला (Air Force Rescued a Student at Nandi Hills). कधीही पाहिला नसेल असा जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video of Rescue Operation) होत आहे. ज्यामध्ये हवाई दल त्या तरुणाची एम17 हेलिकॉप्टरमधून यशस्वीपणे सुटका करत आहे. हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, या कारवाईदरम्यान त्यांना स्थानिक पोलिसांचं पूर्ण सहकार्य मिळालं आणि त्यांच्यामुळेच या तरुणाला वेळीच ट्रेस करता आलं. मात्र ज्या ठिकाणी हा तरुण अडकला होता, तिथे हेलिकॉप्टर उतरवणं अत्यंत अवघड होतं. यामुळे वायुसेनेने Mi-17 च्या फ्लाइट गनरला विंचद्वारे ट्रेकरपर्यंत पोहोचवलं आणि फ्लाइट रनरने वेळीच त्या तरुणाला वर उचलले. यानंतर लगेचच या युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

जाहिरात

या तरुणाबाबत माहिती मिळाली आहे की, तो इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असून मूळचा दिल्लीचा आहे. तो बंगळुरूमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता आणि ट्रेकिंगच्या उद्देशाने नंदी टेकडीवर पोहोचला होता. मात्र काही कारणाने त्याचा तोल गेला आणि तो कठड्यावरून खाली पडला. तो तरुण मध्येच कुठेतरी अडकला नसता तर थेट 300 फूट खोल दरीत पडला असता. VIDEO : पंतप्रधान मोदी स्टेजवरच कार्यकर्त्याच्या पाया पडले; जाणून घ्या कारण याआधी केरळमध्ये पलक्कड टेकडीच्या दरीतही एक तरुण अडकला असताना भारतीय लष्कराने असंच बचावकार्य केलं होतं. तिथे तो ४५ तास अडकून पडला होता. मात्र त्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि एनडीआरएफने संयुक्तपणे बचाव मोहीम राबवून तरुणाला सुखरूप वाचवलं गेलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात