नवी दिल्ली 21 जुलै : सिंह म्हणजेच जंगलाचा राजा इतर प्राण्यांचं मांस खाऊन आपली भूक भागवतो. मात्र तुम्ही कधी सिंहाला गवत खाताना पाहिलं आहे का? आपण लहानपणीपासूनच असं ऐकलं आहे, की सिंह हा मांसाहारी प्राणी आहे आणि इतर प्राण्यांची शिकार करून तो आपलं पोट भरतो. मात्र आता सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक विशालकाय सिंह चक्क झाडाची पानं खाताना दिसत आहे. या व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल. मात्र यामागचं कारण आणखीच रंजक आहे. भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, होय - सिंह कधी कधी गवत आणि पानं खातात. हे आश्चर्यकारक वाटू शकतं, परंतु ते गवत आणि पाने का खातात? यामागे अनेक कारणे आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्या पोटात दुखतं तेव्हा पाणी पिण्याऐवजी त्यांना झाडाची पानं खायला आवडतं. त्यामुळे पोटदुखीपासून आराम मिळतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक विशाल सिंह झाडाच्या फांद्या ओढून पानं खात आहे.
Yes. Lions sometimes eat grass & leaves. It may come as a surprise, but there are many reasons as why they eat grass & leaves.
— Susanta Nanda (@susantananda3) July 21, 2023
It helps them to settle stomach aches & in extreme cases provides water. pic.twitter.com/Crov6gLjWm
व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत. यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. काही तासांपूर्वीच शेअर केलाला हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत तो 15 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत आणि अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, ‘गवत आणि पानं मांस पचण्यास मदत करतात, माझा कुत्रा पोटभर जेवूनही गवत खात असे. ईशान्येकडील लोक भरपूर मांस खातात, म्हणून ते हे मांस मसाल्यात शिजवत नाहीत तर वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्यांमध्ये शिजवतात. यामुळे मांस पचतं असं त्यांना वाटतं’. Viral Video: ATM मशिनमध्ये जाऊन बसला भलामोठा साप; लोक पैसे काढायला येताच.., थरकाप उडवणारी घटना सिंह गवत खाण्यामागे आणखी एक कारण आहे. जेव्हा सिंह एखाद्या प्राण्याची-पक्षाची शिकार करतो तेव्हा तो त्याचे पंख, केस आणि हाडेदेखील गिळतो. मांस पचायला सोपं असतं, पण या गोष्टी पचवणं सिंहालाही अवघड जातं. म्हणूनच ते पानं आणि गवत चावतात. गवत त्यांच्यासाठी पाचक म्हणून काम करतात. कारण गवतामध्ये फॉलिक अॅसिड असतं जे आहारात सप्लिमेंटचं काम करतं. मांस खाल्ल्यानंतर कुत्रे आणि मांजरीदेखील असंच करतात.