नवी दिल्ली, 14 मे : इंग्रजी भाषेतील मजकुर समजला नाही तर त्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर केला जातो. मात्र यात कधी लहान चूक तर कधी मोठी चूक होऊ शकते. आता सोशल मीडियावर भाषांतरात झालेल्या चुकीचा फोटो व्हायरल होत आहे. Dosa Batter इंग्रजीत नीट लिहिलं आहे मात्र हिंदीत लिहिताना गोंधळ झाला आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत Idli/ Dosa Batter हे इंग्रजीसह इतर दोन भाषांमध्ये लिहिण्यात आलं आहे. पाकिटावर इडली Dosa Batter चं हिंदी भाषांतर इडली डोसा बल्लेबाज असं लिहिण्यात आलं आहे. इडली डोसा बल्लेबाज असं पाकिटावर लिहिलेला फोटो व्हायरल होत असून लोकांनी अनेक कमेंटही यावर केल्या आहेत. एका युजरनं हा फोटो शेअर करताना म्हटलं की, ही गूगलची चूक आहे. ज्यानं कोणी हे पाकिट तयार केलं त्यानं Batter चं हिंदी ट्रान्सलेशन हे गुगलवरून केलं आहे.
Damn you Google Translate!
— Harpreet (@CestMoiz) May 13, 2020
🤣#Indyeah! pic.twitter.com/9hLBWywE38
सोशल मीडियावर याशिवाय इतरही काही फोटो युजर्स शेअर करत आहे. एका युजरनं दुकानाच्या बोर्डचा फोटो शेअर करताना म्हटलं की, ही चूक इतर कोणाची नाही तर गूगलची आहे. हे वाचा : OMG! इंडियन Mr. Bean; तुम्ही हे व्हिडीओ पाहिलेत की नाही? इंग्रंजी शब्दांना जेव्हा आपण गुगल ट्रान्सलेट करतो तेव्हा अनेकदा वेगळाच अर्थ येतो. यअसेच काही दुकानाच्या बोर्ड आणि पाकिटावर छापलेल्या नावाबाबत झालं असल्याचं एका युजरनं म्हटलं आहे. हे वाचा : धक्कादायक! डॉक्टरांनी उपचाराऐवजी रुग्णाची केली चपलांनी धुलाई, VIDEO VIRAL