प्रतिनिधी- सर्वेश दुबे प्रयागराज, 14 एप्रिल : कोरोना व्हायरसविरोधात आरोग्य सेवा आणि डॉक्टर आपलं कर्तव्य अहोरात्र बजावत आहेत. काही भागांमध्ये लोकांकडून डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ले झाले होते. त्यानंतर आता एका भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. डॉक्टरांनी एका रुग्णाची उपचार करण्याऐवजी धुलाई केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथे मोतीलाल नेहरी मेडिकल कॉलेज अंतर्गत असलेलं SRN रुग्णालयातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी या रुग्णाला चपलांनी बेदम मारहाण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण कोरोना संशयित असल्याची चर्चा आहे. तर हे रुग्णालय कोविड-19 लेवल थ्रीसाठी असल्याचीही माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण आपल्या हाताची नस कापल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी आला होता. त्यावर उपचार करण्याऐवजी डॉक्टरांनी त्याला चपलांनी मारहाण केली आहे. हा रुग्ण कोरोना संशयित असल्याचा दावाही केला होता मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. रुग्णावर उपचार करण्याआधी अशा पद्धतीनं बेदम मारहाण केल्याप्रकऱणी पोलिसांनी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे वाचा- VIDEO : पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर भिडले, प्लॅटफॉर्मवर बिस्कीटांसाठी तुफान राडा हे वाचा- तान्हुल्याची फरफट, पायी प्रवास करणाऱ्या आईनं केली सुटकेसची बाबागाडी हे वाचा- VIDEO : लॉकडाऊनमध्ये पोटापाण्यासाठी ‘या’ तरुणानं केला महागातला जुगाड! संपादन- क्रांती कानेटकर