जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ओळखा पाहू! हा कुत्रा आहे की मांजर? 99 टक्के लोकांनी दिलं चुकीचं उत्तर

ओळखा पाहू! हा कुत्रा आहे की मांजर? 99 टक्के लोकांनी दिलं चुकीचं उत्तर

ओळखा पाहू! हा कुत्रा आहे की मांजर? 99 टक्के लोकांनी दिलं चुकीचं उत्तर

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल(Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून 99 टक्के लोकांनी चुकीचं उत्तर दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा आपल्याला निरनिराळे चॅलेंज (Challenge) पाहायला मिळतात. अनेकदा यात आपल्याला डोकं चालवावं लागतं, तर अनेकदा आपल्या नजरेनं फोटोमधील काही गोष्टी ओळखाव्या लागतात. यात अनेकदा असे फोटो आणि व्हिडिओ असतात जे पाहून आपण कन्फ्यूज होतो. कारण अनेक फोटो किंवा व्हिडिओ असे असतात, ज्यात पहिल्याच क्षणी आपल्याला काहीतरी वेगळं दृश्य दिसतं, मात्र प्रत्यक्षात हे काहीतरी वेगळंच असतं. या महिलेला बघताच प्रेमात पडतात पुरुष; पण तिचं ‘हे’ सत्य जाणून लगेचच काढतात पळ या फोटो तसंच व्हिडिओमधील बरोबर गोष्टी ओळखण्यासाठी आपल्याला योग्य नजर आणि बुद्धीची गरज असते. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून 99 टक्के लोकांनी चुकीचं उत्तर दिलं आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच गोंधळात पडाल, की यात दिसणारा प्राणी कुत्रा आहे की मांजर. मात्र काहीच सेकंद हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सत्य समजेल.

जाहिरात

व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला एका घराचं छत दिसेल. यावर एक प्राणी बसलेला दिसतो. यानंतर कॅमेरा त्या प्राण्यावर झूम होतो. कॅमेरा झूम केल्यावर छतावर आपल्याला कुत्र्याचा चेहरा दिसतो. 99 टक्के लोकांना हा कुत्र्याचाच चेहरा असल्याचं वाटलं. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या लोकांचा आवाज ऐकूनही हेच समजतं की त्यांनाही हे कुत्र्याचं डोकं वाटलं होतं. इंजिनिअर का व्हायचंय? चिमुकल्याने दिलेलं उत्तर ऐकून पोट धरून हसाल, VIDEO खरंतर या व्हिडिओमध्ये दिसणारा प्राणी कुत्रा नसून मांजर आहे. दुसऱ्याच क्षणी जेव्हा कॅमेरा अधिक झूम केला जातो, तेव्हा मांजर मागे पाहते आणि सगळं चित्र स्पष्ट होतं. शेवटी तुम्हाला समजेल की छतावर बसलेली हा मांजर आहे. मात्र, पहिल्यांदा पाहताना तुम्हाला हा कुत्राच वाटेल. व्हिडिओ viralhog नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यूजरने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं, कुत्रा की मांजर…तुम्हाला काय दिसलं?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात