जाहिरात
मराठी बातम्या / Viral / म्हशीला जिवंत ओरबडून खात होता हायना; इतक्यात सिंहांची एन्ट्री झाली अन् डावच पलटला..VIDEO

म्हशीला जिवंत ओरबडून खात होता हायना; इतक्यात सिंहांची एन्ट्री झाली अन् डावच पलटला..VIDEO

जंगलातील लढाईचा व्हिडिओ

जंगलातील लढाईचा व्हिडिओ

अनेक सिंह मिळून म्हशीपर्यंत पोहोचतात आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागतात. तेव्हाच म्हैस आक्रमक होते. सिंह हल्ला करण्यापूर्वीच ती त्यांच्यावर हल्ला करते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 04 मे : जंगलात प्रत्येक प्राण्याचा स्वतःचा दर्जा असतो. कुणी कुणाला घाबरतं तर कुणी कुणाला घाबरवतं. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, पण मगर पाण्यात असेल तर तो नदीत जाऊ शकत नाही. समोर म्हैस असेल तर त्याची हवा टाईट होते. हत्ती समोर आला तर तो लपून पळून जाणंच बरं समजतो. पण संधी मिळाली तर तो कोणालाच सोडत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

Maasai Sightings नावाच्या अकाऊंटवरून YouTube वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो व्हायरल होत आहे. या 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक म्हैस जंगलात बसलेली आहे. मग तिथे हायना येतो आणि तिला जिवंतच ओरडबडू लागतो. म्हैस त्याला काहीच करत नाही. तो म्हशीवर हल्ला करत राहतो. दरम्यान, म्हशीला पाहून सिंहांना शिकारीची चांगली संधी असल्याचं वाटतं. अनेक सिंह मिळून म्हशीपर्यंत पोहोचतात आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागतात. तेव्हाच म्हैस आक्रमक होते. सिंह हल्ला करण्यापूर्वीच ती त्यांच्यावर हल्ला करते. शेवटी म्हशीने एकाच वेळी अनेक सिंहांना पळवून लावलेलं दिसतं. दुसरीकडे, सिंहांना पाहून हायना पळून जातो. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सिंह म्हशीवर हल्ला करू शकत नाहीत आणि शेवटी त्यांना पळ काढावा लागल्याचं दिसतं. हा व्हिडिओ आफ्रिकेतील सवाना जंगलातील आहे.

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता, तो आतापर्यंत 45 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, जंगलातील जीवन क्रूर आहे, तुम्ही फुटेजमध्ये पाहू शकता. सिंह येईपर्यंत हायना म्हशीला जिवंत खात होता. मात्र ते पोहोचताच तो पळून गेला. हे जंगलात टिकून राहण्याच्या शर्यतीची आठवण करून देतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: lion , wild life
  • First Published :
जाहिरात
जाहिरात