विशाखापट्टणम इथे 7 मे रोजी झालेल्या गॅस गळतीचं धक्कादायक CCTV (1/2) pic.twitter.com/TZ2xMCZQ9g
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) May 16, 2020
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) May 16, 2020हे वाचा-चौथ्या मजल्यावर गॅलरीत बसून मुलांना जेवून घालत होती आई, स्टूलवरून तोल गेला आणि.. अख्खा गाव शांत झोपेत होता आणि ही गॅस गळती या फॅक्टरीमधून साधारण पहाटे 3.30 च्या सुमारास झाली होती. काही मिनिटांमध्ये जवळपास 5 गावांमध्ये या गॅस गळतीचा प्रभाव दिसून आलाा होता. अनेक लोकांचे डोळे आणि त्वचा जळजळत होती तर काहींना श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं बेशुद्ध झाले होते. या व्हिडीओमधून आपण पाहू शकता हा विषारी गॅस कसा वेगानं गावांमध्ये पसरत आहे. कॅमेऱ्यामध्ये 3.51 मिनिट पाहाटेची वेळ दिसत आहे. पोलिसांनी 9 गावांना सील केलं होतं. पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या व्यक्तींना सर्वात पहिल्यांदा याचा त्रास जाणवू आणि त्या व्यक्ती चक्कर येऊन रस्त्यावर पडली.रस्त्यावर चालणारी एक स्त्री बेशुद्ध पडली आणि वाटेत अस्वस्थ झाली. हा विषारी वायू वेगानं आजूबाजूच्या गावांमध्ये पसरत आहेत त्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे वाचा-धारदार शस्त्रांसह दोन गट भिडले, हत्येचा LIVE VIDEO आला समोर संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vishakhapattam