हैदराबाद 31 मार्च : आपल्याला एखादा पदार्थ कितीही आवडत असला तरी आपण तो किती प्रमाणात खावा याबाबत काही मर्यादा ठेवतो. मात्र, काही लोक असेही असतात, जे अगदी दररोजही हा पदार्थ खायला कंटाळत नाहीत. अशीच काहीशी एक घटना नुकतीच हैदराबादमधून समोर आली आहे. दक्षिणेकडील या शहरात इडली ही भरपूर लोकांची पहिली पसंती असते. याच इडलीची एक कहाणी आज तुम्हाला सांगणार आहोत.
माणसाच्या आकाराएवढं वटवाघुळ कधी पाहिलंय का? घराला लटकलेला Photo व्हायरल
लोकांना त्यांच्या घरी जेवण पुरवणाऱ्या ‘फूड डिलिव्हरी’ प्लॅटफॉर्म स्विगीने गुरुवारी सांगितलं की, हैदराबादमधील एका व्यक्तीने गेल्या 12 महिन्यांत या अॅपद्वारे सहा लाख रुपयांची इडली ऑर्डर केली आहे. दरवर्षी 30 मार्च रोजी 'जागतिक इडली डे' साजरा होतो. याच दिवसाचं औचित्य साधत स्विगीने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.
स्विगीने एका प्रकाशनात म्हटलं आहे की, हे विश्लेषण 30 मार्च 2022 ते 25 मार्च 2023 या कालावधीसाठीचं आहे. हे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ इडलीच्या लोकप्रियतेबद्दल मनोरंजक माहिती देतं. हैदराबादमधील एका ग्राहकाने गेल्या वर्षी सर्वाधिक इडल्या मागवल्या आणि इडलीवर सहा लाख रुपये खर्च केल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या काळात त्याने 8,428 प्लेट इडली मागवल्या.
देशातील अनोखं रेल्वे स्टेशन; इथे लोक रोज खरेदी करतात तिकीट पण प्रवासच करत नाहीत, रंजक आहे कारण
स्विगीने गेल्या 12 महिन्यांत इडलीच्या 3.3 करोड प्लेट्स वितरित केल्या, जे या डिशची लोकांमध्ये असलेली प्रचंड लोकप्रियता दर्शवतं. आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये सर्वाधिक इडल्या मागवल्या जातात. इतर शहरांमध्ये मुंबई, कोईम्बतूर, पुणे, विशाखापट्टणम, दिल्ली, कोलकाता आणि कोची यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, इडली ऑर्डर करण्यासाठी सर्वात पसंतीची वेळ म्हणजे सकाळी 8 ते 10 ही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.