नवी दिल्ली, 30 मार्च : जगभरात अनेक भिन्न भिन्न प्रकारचे प्राणी आहेत. यामध्ये अनेक भयावह प्राण्यांचा समावेश होतो. काही काही प्राणी तर एवढे अवाढव्य असतात त्यांना लांबूनच पाहून धडकी भरते. सध्या मानवाच्या आकाराएवढ्या वटवाघुळाचा फोटो समोर आलाय. या फोटोने सध्या सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे.
मानवी आकाराच्या वटवाघळाची काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यामुळे लोक घाबरले आहेत. त्याची काही छायाचित्रे एका ट्विटर वापरकर्त्याने कॅप्शनसह शेअर केली आहेत, “मी तुम्हाला फिलिपाइन्समधील मानवी आकाराच्या वटवाघुळांबद्दल सांगितले तेव्हा आठवते का? होय, मी याबद्दलच बोलत होतो." पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये घराबाहेर साडेपाच फूट मोठी वटवाघुळ उलटी लटकलेली दिसत आहे. एवढी मोठी वटवाघुळ पाहून लोकांचे थक्क झालेत. 'गोल्डन-क्राऊन्ड फ्लाइंग फॉक्स'चे तपशीलही एका छायाचित्रात शेअर केले आहेत.
Remember when I told y'all about the Philippines having human-sized bats? Yeah, this was what I was talking about pic.twitter.com/nTVIMzidbC
— hatdog² (@AlexJoestar622) June 24, 2020
@AlexJoestar622 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हे वटवाघुळचे फोटो शेअर केले आहेत. अगदी काही वेळात हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोवर बऱ्याच प्रतिक्रियाही पहायला मिळत आहेत. अनेकांनी तर पाहूनच भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकारचं वटवाघुळ क्वचितच दिसतं. त्यामुळे अनेकांनी अशा वटवाघळाविषयी ऐकलं किंवा पाहिलं नसेल.
दरम्यान, सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक विचित्र, हटके घटना समोर येत असतात. आपण कधी ऐकलेल्या पाहिलेल्या नसतील अशा बऱ्याचशा गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Top trending, Viral, Viral photo