Home /News /viral /

बेपत्ता पत्नीला शोधण्यासाठी दीड महिना केला सायकलवर प्रवास; अखेर रुग्णालयात भेट झाली पण...

बेपत्ता पत्नीला शोधण्यासाठी दीड महिना केला सायकलवर प्रवास; अखेर रुग्णालयात भेट झाली पण...

लग्नानंतर पहिल्या वर्षभरात नातलगांकडे जाणे, पार्ट्यांना जाणं,कार्यक्रम,सण यामुळे नवीन पदार्थ खाणं होतं राहतं.

लग्नानंतर पहिल्या वर्षभरात नातलगांकडे जाणे, पार्ट्यांना जाणं,कार्यक्रम,सण यामुळे नवीन पदार्थ खाणं होतं राहतं.

पतीनं आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी काहीही अॅक्शन घेतली नाही. यामुळे पती स्वतःच सायकलवर आपल्या पत्नीला शोधायला निघाला

    भोपाळ 03 सप्टेंबर : पती आणि पत्नी यांचं नातं (Relation of Husband and Wife) अतिशय पवित्र मानलं जातं. या नात्याविषयीच्या रोज कित्येक बातम्या समोर येत असतात. यातल्या अधिक बातम्या नवरा बायकोच्या भांडणावरच असतात. मात्र, आता मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एक अशी बातमी समोर आली आहे, जी वाचून तुम्हीही भावुक (Emotional News) व्हाल. यात एक पती आपल्या हरवलेल्या पत्नीला शोधण्यासाठी सायकलवरच (Cycle) दारोदार भटकत राहिला. त्याची पत्नी दीड महिन्यापासून बेपत्ता होती. VIDEO: मंडपातच चढला नवरीचा पारा; पुढे जे केलं ते पाहून पाहुणेही थक्क मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या (Uttar Pradesh) प्रयागराज जिल्ह्यातून एक संगिता नावाची महिला दीड महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली होती. महिलेचं मानसिक आरोग्य ठीक नव्हतं. यामुळे महिला बेपत्ता झाल्यानंतर तिचा पती कुंवर बहादूर हताश झाला. तो सायकलवरच आपल्या पत्नीला शोधण्यासाठी निघाला. त्यानं प्रत्येक ठिकाणी आपल्या पत्नीचे फोटो लावले. अखेर त्याला आपल्या पत्नीबद्दल माहिती मिळाली. यानंतर तो सायकलवरच जवळपास 150 किलोमीटर प्रवास करून मध्य प्रदेशच्या रीवामध्ये पोहोचला. पैसे अन् पिशवी घेऊन बाजारात पोहोचला कुत्रा; खरेदीचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO रीवामध्ये त्याची पत्नी संजय गांधी रुग्णालयात दाखल झाली होती. पत्नीला पाहून पती भावुक झाला आणि रडू लागला. कुंवर बहादूरनं सांगितलं, की तो मागील दीड महिन्यापासून आपल्या पत्नीला शोधत आहे. उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागांमध्ये जात त्यानं आपल्या पत्नीचे पोस्टर लावले. जेव्हा कोणी ही महिला दिसल्याचं सांगत असत तेव्हा तो तिथे जात असे. एका ठिकाणाहून त्याला ही महिला रीवा येथे असल्याची माहिती मिळाली, यानंतर तो तिथे पोहोचला. पतीनं आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी काहीही अॅक्शन घेतली नाही. यामुळे पती स्वतःच सायकलवर आपल्या पत्नीला शोधायला निघाला. पत्नीला शोधण्यासाठी यूपी आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये फिरला. यादरम्यान रस्त्यात काही लोकांनीही त्याची मदत केली. कधी कोणी काही खायला दिल्यास तो खायचा नाहीतर उपाशीच आपल्या पत्नीच्या शोधात निघायचा.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Viral news, Wife and husband

    पुढील बातम्या