व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती उंच मोबाईल टॉवरवर चढली आहे. ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार ही घटना राजस्थानच्या कोटामधील आहे. या व्यक्तीची बायको त्याला सोडून माहेरी गेली. पत्नी सोडून गेल्याने त्याला दुःख सहन झालं नाही. त्यामुळे तो थेट मोबाईल टॉवरवर चढला. तब्बल 3 तास त्याचा हा ड्रामा सुरू होता. अगदी शोलेतील बसंतीच्या वीरूलाही या नवरोबाने मागे टाकलं आहे. हे वाचा - आश्चर्य! व्हेलने शिकार केली; 40 सेकंदातच तिच्या जबड्यातून जिवंत आली व्यक्ती मोबाईल टॉवरवर बरेच लोक जमले. पोलीसही आले. त्या व्यक्तीला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होते. पण तो काही ऐकनाच. शेवटी पोलिसांनी त्याच्या पत्नीला माहेरून बोलावलं. त्याची पत्नी आपल्या नवऱ्याचा प्रताप समजताच धावत घटनास्थळी आली. बायको माहेरून परत आल्याचं पाहताच त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. पत्नीला भेटण्यासाठी लगेच ही व्यक्ती मोबाईल टॉवरवरून खाली उतरली. सुदैवाने त्याला कोणताही दुखापत झाली नाही.कोटा - पत्नी वियोग में पति चढ़ा मोबाइल टावर पर, 3 घंटे चला ड्रामा -पुलिस ने मौके पर पीहर से बुलाई पत्नी, पत्नी को देखकर फिर नीचे उतरा पति ,,😂 pic.twitter.com/tB5ZeCXRJb
— Alok Kumar (@dmalok) June 12, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajasthan, Viral, Viral videos, Wife and husband