मराठी बातम्या /बातम्या /Viral /अस्वलाने केला Poll Dance, बघणारे झाले खूश; पाहा मजेशीर VIDEO

अस्वलाने केला Poll Dance, बघणारे झाले खूश; पाहा मजेशीर VIDEO

एक भलंमोठं अस्वल पोल डान्स करतानाचा (Bear poll dance video goes viral) व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

एक भलंमोठं अस्वल पोल डान्स करतानाचा (Bear poll dance video goes viral) व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

एक भलंमोठं अस्वल पोल डान्स करतानाचा (Bear poll dance video goes viral) व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

एक भलंमोठं अस्वल पोल डान्स करतानाचा (Bear poll dance video goes viral) व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. तुम्ही आजवर अनेक प्रकारचे पोल डान्स पाहिले असतील. वेगवेगळ्या ढंगाचे (Various types of poll dance) आणि स्वरुपाचे पोल डान्स अनेकांनी पाहिले असतील. मात्र सध्या व्हायरल होत असलेला (Bear poll dance goes viral) पोल डान्स मात्र अनोखा आहे.

View this post on Instagram

A post shared by EARTH FOCUS (@earthfocus)

अस्वलाचा पोल डान्स

या व्हिडिओत आपल्याच मस्तीत धुंद असणारं अस्वल पोल डान्स करताना दिसत आहे. एका खांबाला घासून ते उभं आहे आणि जणू काही डान्स केल्याच्या अविभार्वात ते डुलतं आहे त्यामुळे अस्वल डान्सच करत असल्याचा आभास निर्माण होत आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून त्याला नेटिझन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. स्वतःच्या आनंदात धुंद असणाऱ्या या अस्वलामुळे येणाजाणाऱ्यांचं चांगलंच मनोरंजन होत आहे.

हे आहे कारण

Earthfocus नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या विषयातील तज्ज्ञांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार अस्वल हे सतत कशाला ना कशाला आपली पाठ घासत असते. अस्वलाला नैसर्गिकरित्या वारंवार खाज सुटते. ती शमवण्यासाठी कुठल्याही खडबडीत गोष्टीला पाठ घासण्याची गरज निर्माण होते. अनेकदा जंगलातील झाडांना अशा प्रकारे अस्वलं पाठ घासताना दिसतात. या व्हिडिओत झाडाऐवजी तिथं उभ्या असणाऱ्या पोलला हे अस्वल पाठ घासत आहे. त्यामुळे अस्वलानं पोल डान्स केल्याचा आभास निर्माण होत असून त्याला नेटिझन्सकडून जोरदार पसंती मिळत आहे.

हे वाचा- Oh No! Construction site वर काम करते मॉडेल, म्हणते सौंदर्याचा होतो त्रास

लोकांना व्हिडिओ वाटतोय CUTE

नेटिझन्सना हा व्हिडिओ Cute वाटत असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरून लक्षात येत आहे. हा व्हिडिओ पाहून आपला दिवस सार्थकी लागला, अशी प्रतिक्रिया एका नेटिझननं दिली आहे, तर आपण आयुष्यात पहिल्यांदाच डान्सिंग बिअर पाहिल्याची प्रतिक्रिया एकानं दिली आहे.

First published:

Tags: Funny video, Viral video.