मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बायकोच्या बडबडीला वैतागलात? या व्यक्तीला सापडला तिची बोलती करणारा रिमोट

बायकोच्या बडबडीला वैतागलात? या व्यक्तीला सापडला तिची बोलती करणारा रिमोट

बायकोला कंट्रोल करणाराही एक रिमोट असावा अशी इच्छा बहुतेक नवऱ्यांची असते.

बायकोला कंट्रोल करणाराही एक रिमोट असावा अशी इच्छा बहुतेक नवऱ्यांची असते.

बायकोला कंट्रोल करणाराही एक रिमोट असावा अशी इच्छा बहुतेक नवऱ्यांची असते.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 08 जुलै : बायकोची (Wife) बडबड... ही समस्या बहुतेक पुरुषांची आहे. तिची बडबड थांबवण्याचा काही मार्ग आहे का? याचा विचार कितीतरी पुरुष (Husband) करतात. तुमचंही लग्न झालं असेल आणि इतर नवऱ्यांप्रमाणे तुमचीही अशीच व्यथा असेल तर  बायकोला कंट्रोल करणारा एखादा रिमोट (Wife silence remote) असता तर किती बरं झालं असतं, असं एकदा तरी तुमच्या मनात नक्कीच आलं असेल. एका व्यक्तीच्या हाती असा रिमोट (Weird Remote) लागला आहे. ज्याचा व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होतो आहे.

एका व्यक्तीला एक विचित्र रिमोट सापडला आहे. हा रिमोट अगदी टीव्ही, एसीप्रमाणे त्याच्या पत्नीलाही कंट्रोल करत आहे. ट्विटवर हा मजेशीर व्हिडीओ (Funny Video) व्हायरल होत आहे.

व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती सोफ्यावर शांत बसली आहे. आणि त्याची पत्नी फक्त बडबड बडबड करते आहे. त्या व्यक्तीच्या हातात एक रिमोट आहे. त्या रिमोटचं एक बटण दाबतो आणि मग काय जादूच होते.

हे वाचा - नवरदेवाला पाहताच उडाला नवरीच्या चेहऱ्याचा रंग; ढसाढसा रडली आणि...; पाहा VIDEO

त्याच्या पत्नीचा आवाज म्युट होतो. म्हणजे ती बडबडते तर आहे पण त्या व्यक्तीला ऐकू येत नाही. मग ही व्यक्ती एकेएक करत रिमोटच्या सर्व बटणांचा बायकोवर प्रयोग करून पाहतो. रिमोटमार्फत तो आपल्या बायकोचा म्युटच नाही तर रिवाइंड आणि फॉरवर्ड आणि पॉझही करतो आणि शेवटी तो स्विच ऑफ बटण दाबतो आणि त्याची बायको गायबच होते.

यपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक अशा रिमोटची मागणी करत आहेत. तुम्हालाही असाच रिमोट हवा असेल हो की नाही.  हा रिमोट कुठे मिळेल, असं तुम्ही विचाराल.

हे वाचा - ओहो! महागड्या रेस्टॉरंटमध्ये काकांचा झाला गोंधळ; VIDEO पाहून पोट धरून हसाल!

पण बायकोला अशा पद्धतीने कंट्रोल करणारा रिमोट आतापर्यंत तरी तयार झालेला नाही. हा व्हिडीओ मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला गप्पपणे बायकोची बडबड ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी नाही.

First published:

Tags: Couple, Funny video, Viral, Viral videos, Wife and husband