जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा मोठा निर्णय; स्वतःचं जेंडरचं बदलून घेतलं, कारण वाचून व्हाल थक्क

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा मोठा निर्णय; स्वतःचं जेंडरचं बदलून घेतलं, कारण वाचून व्हाल थक्क

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा मोठा निर्णय; स्वतःचं जेंडरचं बदलून घेतलं, कारण वाचून व्हाल थक्क

जेव्हा 57 वर्षीय व्यक्तीचा जन्म झाला तेव्हा तो एक पुरुष होता आणि त्याचं नाव टोनी होतं. पण जेव्हा टोनी लहान होता तेव्हा त्याला आधीच कळालं होतं की तो चुकीच्या शरीरात अडकला आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 जानेवारी : एखाद्या व्यक्तीचं जेंडर सांगतं की तो पुढचं आयुष्य कसं आणि काय म्हणून जगेल, परंतु लैंगिकता देखील काळाबरोबर बदलू शकते आणि लोक ती आपल्या खऱ्या बनावटीप्रमाणे बदलूनही घेतात. अशीच एक घटना इंग्लंडमध्ये उघडकीस आली, जेव्हा एक पुरुष पत्नीच्या मृत्यूनंतर स्त्री बनला. त्याला आपल्या पत्नीचा हेवा वाटत होता, त्याला तिच्यासारखं व्हायचं होते आणि शेवटी 50 वर्षांनंतर त्याने त्याची इच्छा पूर्ण केली. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, जेव्हा 57 वर्षीय व्यक्तीचा जन्म झाला तेव्हा तो एक पुरुष होता आणि त्याचं नाव टोनी होतं. पण जेव्हा टोनी लहान होता तेव्हा त्याला आधीच कळालं होतं की तो चुकीच्या शरीरात अडकला आहे. त्याला स्त्रिया नाही, तर स्त्रियांशी संबंधित गोष्टी आवडत असे. त्याला आपल्या आईसारखे कपडे घालायला आवडायचे. तिच्यासारखा मेकअप करायची इच्छा व्हायची, पण हे सगळं कधी सुरू करावं हे कळत नव्हतं. यानंतर त्याने गुपचूप मुलींचे कपडे घालायला सुरुवात केली पण लोकांसमोर तो पुरुषच होता. प्रेमासाठी वाट्टेल ते! मैत्रिणीवर प्रेम जडताच तरुणीनं बदलून घेतलं लिंग, पण पुढे नको ते घडलं… 1980 मध्ये 23 वर्षांचा असताना तो व्यक्ती थेरेसा यांना भेटला. त्याला थेरेसाचा लूक आवडला, टोनीला तिच्यासारखं व्हायचं होतं आणि थेरेसाला तो एक माणूस म्हणून आकर्षक वाटला. दोघांचं लग्न झालं, त्यांना मुलं झाली. परंतु त्यादरम्यान टोनी एक पुरुष म्हणूनच ओळखला जाऊ लागला. टोनी महिलांचे कपडे घालतो हे थेरेसाला कळलं होतं पण त्याला स्त्री बनायचं आहे हे तिला माहीत नव्हतं. टोनीला त्याची पत्नी थेरेसासारखं व्हायचं होतं. तिच्यासारखे ब्लॉन्ड केस हवे होते आणि स्टाईल हवी होती. थेरेसा यांना 2016 मध्ये स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आणि जानेवारी 2019 मध्ये त्यांचं निधन झालं. याबद्दल टोनीला खूप वाईट वाटलं, पण त्याला वाटलं की हीच ती वेळ आहे जेव्हा त्याने आपलं सत्य स्वीकारावं आणि सर्वांसमोर आणावं. सप्टेंबर 2019 मध्ये तो डॉक्टरकडे गेला आणि स्वत:ला ट्रान्सजेंडर महिला बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. आता तो चेरलिन हॉल म्हणून ओळखला जातो. ती आता हार्मोनचं सेवन करत आहे ज्यामुळे तिचे पुरुषत्व संपुष्टात येत आहे. यासोबतच तिचं जेंडर कन्फर्मेशन करण्याची शस्त्रक्रिया बाकी आहे, त्यानंतर ती पूर्ण महिला होईल. त्याच्या मुलांनी त्याला अशा प्रकारे स्विकारलं आहे. मात्र अनेक वेळा त्याला समाजातील इतर लोकांकडून नकारात्मक वागणूक मिळते. त्याने आपली हेअरस्टाईल आपल्या बायकोसारखी ठेवली आहे आणि त्याच पद्धतीने तो तयार होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात