मुंबई, 27 मे : शारीरिक संबंधांमुळे एखादा लैंगिक आजार झाल्याचं तुम्हाला माहिती असेल पण यामुळे कधी कुणाची स्मृती गायब झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? असंच एक विचित्र प्रकरण सध्या चर्चेत आहे. एका व्यक्तीची स्मृती शारीरिक संबंधानंतर गायब झाली आहे. शारिरिक संबंध ठेवल्याच्या 10 मिनिटांनंतर त्याची मेमरी लॉस झाली. फिजिकल रिलेशननंतर या व्यक्तीला विचित्र आजार झाला
(Man memory loss after physical relationship).
66 वर्षांची या व्यक्तीचं प्रकरण आयरिश मेडिकल जर्नल रिपोर्टमध्ये सविस्तरपणे मांडण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार मेमरी लॉस होण्याच्या दहा मिनिटं आधी या व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते.
पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या दहा मिनिटांनंतर या व्यक्तीने फोन पाहिला आणि ती अस्वस्थ झाली. फोनवरील तारीख पाहून त्यांना काहीतरी मिस केल्यासारखं वाटलं. आपल्या लग्नाचा वाढदिवस आपण मिस केला असं त्यांना वाटू लागलं. कारण एक दिवसापूर्वीच त्यांची वेडिंग अॅनिव्हरी होती. जी त्यांनी साजरीही केली होती. पण या व्यक्तीला ते काहीच आठवत होतं. त्यानंतर या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं.
हे वाचा - असे देश जिथे सेक्स वर्कर्स सरकारला देतात Tax, महिलांना मिळतात हे लाभ
न्यूज ट्रॅक लाइव्हच्या वृत्तानुसार आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल लिमरिकच्या न्यूरॉलॉजी विभागाने सांगितलं की सेक्समुळे मेमरी लॉस झाली असावी असंच या प्रकरणत दिसून येतं आलं. या व्यक्तीची शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाली. म्हणजे शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि त्याआधीचा दिवस या दोन दिवसांतील सर्वकाही तो विसरला होता.
रिपोर्टनुसार सेक्सनंतर या व्यक्तीला Transient Global Amnesia नावाचा आजार झाला. तज्ज्ञांनी या आजाराचा संबंध जुन्या आजारांशी जोडला आहे. त्यांच्या मते, 50 ते 70 वयोगटातील व्यक्तींसोबत असं होऊ शकतं. डॉक्टर या आजाराचा संबंध मायग्रेन, शारीरिक व्यायाम, थंड-गरम पाणी, मानसिक ताण, वेदना आणि शारीरिक संबंधांशी जोडतात. पण रुग्णांसोबत असं वारंवार घडत नाही.
सेक्स करताना मेंदूवर होतो परिणाम
शारीरिक संबंध ठेवताना अनेकांचं डोकं दुखतं. त्याला सेक्स हेडेक म्हणतात. साधारण परिस्थितीमध्ये काळजीचं कारण नाही, पण जर हे वारंवार होत राहिलं तर मात्र हे मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं. संबंध ठेवताना जसजशी उत्तेजना वाढते तसतसं डोकं आणि मानेवर दबाव वाढत जातो. काही लोकांना लैंगिक संबंधापूर्वी किंवा संबंधानंतर खूप डोकेदुखी होते.
हे वाचा - ऐकावं ते नवलंच! भविष्यात मशीन देणार बाळाला जन्म, शास्त्रज्ञांकडून कुत्रिम गर्भाशय विकसित
मस्तकाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्या व्यवस्थित काम करत नाहीत म्हणून हा त्रास होतो. शरीरसंबंधाच्या वेळी धमणी फुलते किंवा त्यात बुडबुडा निर्माण होतो (इंट्राक्रानियल एन्युरिज्म) त्याने वेदना होतात. कधीकधी धमणीच्या भिंतीतून रक्तस्त्राव होतो. याने स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात होऊ शकतो. कधी कधी काही औषधांमुळे देखील ह्या वेदना होतात उदाहरण द्यायचे झाल्यास काही बर्थ कंट्रोल पिल्सचा उपयोग याला कारणीभूत होऊ शकतो. काही संसर्गामुळे येणारी सूज देखील डोकेदुखीचं कारण होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, सेक्स हेडेकपासून बचाव करण्यासाठी ऑर्गेझमच्या अगोदरच शरीरसंबंध थांबवावा. शारीरिक संबंध करताना निष्क्रिय भूमिका ठेवून यापासून वाचता येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.