मराठी बातम्या /बातम्या /Viral /

धक्कादायक! स्वतःच्या हातांनी चक्क मगरीलाच भरवायला गेला तरुण आणि...; VIDEO पाहूनच धडकी भरेल

धक्कादायक! स्वतःच्या हातांनी चक्क मगरीलाच भरवायला गेला तरुण आणि...; VIDEO पाहूनच धडकी भरेल

मगरीसमोर मांस घेऊन तरुण उभा राहिला आणि...

मगरीसमोर मांस घेऊन तरुण उभा राहिला आणि...

मगरीसमोर मांस घेऊन तरुण उभा राहिला आणि...

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 10 डिसेंबर : अनेकांचं प्राण्यांवर इतकं प्रेम असतं की अगदी आपल्या मुलांना भरवावं तसं ते आपल्या हातांनी प्राण्यांनाही भरवतात. कुत्रे, मांजर, माकड यांना स्वतःच्या हातांनी भरवणाऱ्या लोकांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. पण एखाद्या मगरीला (Crocodile video) आपल्या हातांनी भरवावं याचा स्वप्नातही कधी कुणी विचार करणार नाही. पण एका तरुणाने तशी डेअरिंग केली (Crocodile attack video) .

मगरी आपल्या हातांनी खाणं भरवायला गेलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. नॅशनल पार्कमध्ये आपण मगरींना लांबून पाहिलं तरी धडकी भरते. मगरींच्या हल्ल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल होत असतात. मगर अगदी हुशारीने एका फटक्यात कशी शिकार करते हे आपल्याला माहितीच आहेत. त्यात त्या मगरी भुकेल्या असतील आणि आपण त्यांच्यासमोर गेलो तर मग काही खरं नाही. अशाच भुकेल्या मगरीला हा तरुण खायला द्यायला गेला.

@official_viralclips इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी पाणी आहे. त्यावर शेवाळ जमवलेली आहे. एक तरुण हातात मांस घेऊन त्या पाण्याजवळ येतो. पाण्यावर जोरजोरात मांस आपटतो. तितक्यात पाण्यातून कुणीतरी त्या तरुणाच्या दिशेने वेगाने येताना दिसतं. ती दुसरी तिसरी कुणी नाही तर चक्क मगर असते.

हे वाचा - मगरीने तोंडात घट्ट धरून ठेवलं, सुटकेसाठी तरुणीची धडपड; धडकी भरवणारा VIDEO

मगर भुकेली असते आणि तरुण तिच्यासमोर मांसाचा तुकडा आपटताच ती वेगाने धावत येते. तरुणाच्या जवळ येताच ती आपला भलामोठा जबडा उघडते. त्याचवेळी तरुण इतका घाबरतो की मांसाचा तुकडा त्या मगरीच्या जबड्यात टाकतोआणि बाजूला होतो. मगर ते मांस आपल्या जबड्यात घेते. थोडी जरी चूक झाली असती तर त्या मांसाऐवजी हा तरुणच त्या मगरीचा शिकार झाला असता. सुदैवाने तो वेळीच बाजूला होतो म्हणून त्याचा जीव वाचतो.

First published:

Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal