मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे बाप! समुद्रावर तरंगत होता राक्षसी डोंगर, आभासापेक्षा ‘सत्य’ होतं आश्चर्यकारक

बापरे बाप! समुद्रावर तरंगत होता राक्षसी डोंगर, आभासापेक्षा ‘सत्य’ होतं आश्चर्यकारक

समुद्रात दिसणारी ही अवाढव्य गोष्ट कुठली, असा प्रश्न तिला पडला होता. अगोदर वाटलं की हा बर्फाचा डोंगरच आहे. मात्र प्रत्यक्षात काय होतं? वाचा सविस्तर.

समुद्रात दिसणारी ही अवाढव्य गोष्ट कुठली, असा प्रश्न तिला पडला होता. अगोदर वाटलं की हा बर्फाचा डोंगरच आहे. मात्र प्रत्यक्षात काय होतं? वाचा सविस्तर.

समुद्रात दिसणारी ही अवाढव्य गोष्ट कुठली, असा प्रश्न तिला पडला होता. अगोदर वाटलं की हा बर्फाचा डोंगरच आहे. मात्र प्रत्यक्षात काय होतं? वाचा सविस्तर.

कॅनडा, 24 जानेवारी: समुद्रावर (Sea) तरंगत असलेला डोंगराएवढा अवाढव्य आणि राक्षसी तुकडा (Ghosty Iceberg) एका फोटोग्राफरला (Photographer) दिसला आणि त्याने कॅमेऱ्यात (Camera) त्याचे फोटो कैद केले. एका संध्याकाळी सहज फिरण्यासाठी सिमोन एंजेल नावाची फोटोग्राफर समुद्रकिनारी गेली होती. त्यावेळी अचानक तिची नजर समुद्राकडे गेली आणि तिला जे काही दिसलं, ते पाहून तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.

बर्फाचा पहाड की आणखी काही?

समोर बर्फाचा भलामोठा डोंगर असावा, असं चित्र दिसत होतं. अगदी थ्रीडी असणारा आणि चकाकणारा बर्फाचा प्रचंड तुकडाच समुद्रावर जणू तरंगत असल्याचं चित्र होतं. आपल्या परिसरात जर एखादा बर्फाचा डोंगर असता आणि समुद्रावर तो अशा प्रकारे खरोखरच तरंगत असता, तर आपल्या लोकल मीडियात त्याच्या बातम्या आल्याच असत्या, असं तिला वाटलं. त्यामुळे तिनं आपली कल्पनाशक्ती लढवायला सुरुवात केली आणि हे नेमकं काय असावं, याचा ती विचार करू लागली. 

काय असेल ते?

समोर दिसणारा अवाढव्य डोंगराएवढा तुकडा नेमका कशाचा असेल? तो कधीपासून तिथं असेल? तो काही क्षणांपूर्वीच तिथं आला असेल का? बर्फाचा तुकडा असेल तो कुठून आला असेल? तो लाटांसोबत किनाऱ्यावर येऊन धडकेल का? असे अनेक प्रश्नांचं तिच्या मनात काहूर माजलं होतं. मात्र आजूबाजूला कुणीच नसल्यामुळे तिला या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. या काळात तिने आपल्या कॅमेऱ्यात याचे अनेक फोटो काढून घेतले. काही क्षणानंतर समोर दिसणारा हा डोंगर हळूहळू लुप्त होऊ लागला आणि काही क्षणांत तो दिसेनासा झाला. 

हे वाचा -

उलगडलं रहस्य

सिमोननं हा फोटो तिच्या एका शास्त्रज्ञ मित्राला पाठवला आणि या प्रकाराचा उलगडा झाला. या प्रकाराला ‘सुपिरिअर मिराज’ असं म्हणतात, हे तिला समजलं. जेव्हा उष्ण आणि थंड लहरी एकत्र येतात, तेव्हा सूर्याचा प्रकाश अशा प्रकारच्या प्रकाशलहरी तयार करतो. समुद्राच्या क्षितीजापलिकडे असणाऱ्या पर्वतांची प्रतिमा त्याच्यात दिसू लागते आणि तोच डोंगर जणू काही समुद्रात उभा आहे, असं दिसतं. ही जादू नेमकी काय आहे, याचा उलगडा झाल्यानंतर सिमोननं हे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि बघता बघा व्हायरल झाले.

First published:
top videos

    Tags: Iceland, Red light, Sea