लंडन, 25 जानेवारी: युकेचे पंतप्रधान (UK PM) बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या अवैध पार्ट्यांची (Illegal parties) चौकशी (enquiry) आता ब्रिटीश पोलीस (British Police) करणार आहेत. सरकारच्या अंतर्गत चौकशीसोबतच (Internal enquiry) आता पोलीसही या प्रकरणाची चौकशी करणार असल्यामुळे युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अडचणीत येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बोरिस जॉन्सन यांनी केलेल्या पार्ट्यांची चर्चा ही केवळ माध्यमं आणि ब्रिटीश संसदेपुरती मर्यादित होती. मात्र आता खऱ्या अर्थानं चौकशीला सुरुवात झाली आहे. निवासस्थानी झाल्या पार्ट्या युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांची चौकशी ब्रिटीश पोलीस करणार आहेत. आतापर्यंत ज्या ज्या पार्ट्या आयोजित केल्याचं समोर आलं आहे, त्यातील बहुतांश पार्ट्या या लॉकडाऊनच्या काळात आयोजित करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. प्रथमदर्शनी हा नियमभंग असल्याचं सिद्ध होत असून औपचारिक चौकशीनंतर नेमकं काय घडलं होतं, ही बाब समोर येणार आहे. जॉन्सन यांच्यावर चहूबाजूंनी टीका पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सर्व पाहुण्यांना आपापल्या घरून मद्य आणण्याची सूचना करून करण्यात आलेली पार्टी, ब्रिटीश राजपुत्राचं निधन झाल्यावर राष्ट्रीय दुखवटा असताना करण्यात आलेल्या दोन पार्ट्या, वैयक्तिक फ्लॅटवर देण्यात आलेली पार्टी आणि नुकतीच समोर आलेली स्वतःच्या वाढदिवशी कर्मचाऱ्यांकडून आयोजित पार्टीला लावलेली हजेरी या आणि अशा काही पार्ट्यांसाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन अडचणीत सापडले आहेत. अगोदर नकार, मग घोषणा काही दिवसांपूर्वी ब्रिटीश पोलिसांनी अशा प्रकारे कुठलाही तपास सुरू नसल्याचं सांगितलं होतं. मात्र मंगळवारी मेट्रोपॉलिटन पोलीस प्रमुख क्रेसिडा डिक यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या पार्ट्यांची चौकशी सुरू झाल्याची अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. हे वाचा -
एकाच वेळी दोन चौकशा अगोदर सरकारी पातळीवर पार्टीगेट प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहेच. कॅबिनेट ऑफिसनं दिलेल्या माहितीनुसार पार्टी प्रकरणाची चौकशी सरकारी पातळीवर सुरू राहिल आणि पोलीस चौकशी ही स्वतंत्र असेल. कॅबिनेट चौकशीतून ज्या बाबी समोर येतील, त्याची माहिती पोलिसांनाही दिली जाईल. मात्र या चौकशीसाठी किती मुदत देण्यात आली आहे आणि कधीपर्यंत या चौकशीचा अहवाल अपेक्षित आहे, याची कुठलाही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

)







