मुंबई, 14 फेब्रुवारी: एकीकडे व्हॅलेंटाइन डेचा फिवर आहे तर दुसरीकडे परीक्षेचं टेन्शन. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्चपर्यंत असणार आहे. मनोरंजन करण्यासाठी मुलं हातात फोन घेऊन बसतात आणि मोबाईलच्या नादात अभ्यास करायचा विसरून जातात. मग अशावेळी पालकांना ओरडून त्यांच्या हातातून मोबाईल काढून घेत वारंवार अभ्यास करण्याची जाणीव करून दिली जाते. परीक्षा जवळ आल्यानंतर वर्षभर अभ्यास न केल्यानं आपली कशी अवस्था होते याचे काही फनी व्हिडिओ या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल होत आहेत.
@vivek.0001Rush को बोलते है जाम शुरू हो रहे है Board Exams #trending #virał #exam #boardexams #foryou #foryoupage #vivekvermaa♬ original sound - Vivek Verma
यामध्ये आई मोबाईलवर असणाऱ्या मुलाला कानशीलात लगावत आहे आणि बोर्डाची परीक्षा सुरू होणार असल्याचं सांगत आहे.
@vivek.0001पढ़ाई में ध्यान लगा ले शुरू हो रहे हैं पेपर। #trending #virał #exam #boardexams #foryou #foryoupage #vivekvermaa♬ original sound - Vivek Verma
या व्हिडिओमध्ये मोबाईल आणि इतर गोष्टींपेक्षा अभ्यासात मुलानं लक्ष द्यावं म्हणून आईनं मुलाला फटकवलं आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर 32.4 हजार लाईक्स आणि 58 कमेंट्स आल्या आहेत.
@vivek.0001Writing speed से ज्यादा typing speed है। #trending #virał #exam #boardexams #foryou #foryoupage #vivekvermaa♬ original sound - Vivek Verma
आजची मुलं मोबाईल आणि संगणकाला इतकी सरावली आहेत की पेपर लिहिण्याच्या स्पीडपेक्षा टाइपिंग स्पीड जास्त असल्याचा हा फनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 108.9 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. पेपरला वेळ पुरला नाही अशा तक्रार करणाऱ्या मुलांना टाइपिंग स्पीड जास्त जमतो का? टायपिंगपेक्षा लिहिण्यावर भर दिला तर बोर्डाच्या परीक्षेला चांगले मार्क मिळतील असं सांगिण्यात आलं.
याशिवाय परीक्षेआधी आणि परीक्षेदरम्यान अभ्यास न झालेल्या विद्यार्थ्यांची शेवटच्या क्षणी काय अवस्था होते याचे वेगवेळगे फनी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत.