ग्वालियर, 03 जुलै: मागील काही काळापासून तरुणाई सोशल मीडिया आणि डेटिंग साइटकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. लॉकडाऊनच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद असल्यानं अनेक तरुण-तरुणींमध्ये डेटिंग अॅपच्या वापर वाढला आहे. यामुळे अनेकजण ब्लॅकमेलच्या जाळ्यातही सापडत आहेत. मागील सहा महिन्यात पुण्यातील 500 हून अधिक तरुण ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात सापडले आहेत. सोशल मीडिया आणि डेटिंग अॅपद्वारे आरोपी अश्लील व्हिडीओ चॅंटींग करतात. त्यानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, तरुणांची आर्थिक लुट केली जाते. अशीच घटना आता मध्यप्रदेशातील ग्वालियर याठिकाणी देखील उघडकीस आली आहे. ग्वालियर जिल्ह्यात राहाणाऱ्या एका तरुणाला मुंबईतील तरुणीनं हनी ट्रॅपमध्ये गुंतवलं आहे. प्रकरण मिटवून घेण्यासाठी आरोपी तरुणाकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर पीडित युवकानं या घटनेची माहिती आपल्या वडिलांना दिली. याप्रकरणी वडिलांनी मुंबईतील तरुणीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत तपासाला सुरुवात केली आहे. संबंधित पीडित युवक ग्वालियर येथील रहिवासी असून त्याचे वडील किराणा व्यावसायिक आहे. संबंधित तरुणानं काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाईल डेटिंग अॅप इन्स्टॉल केलं होत. मित्रांच्या सांगण्यावरून त्यानं संबंधित अॅपवर आपलं प्रोफाईलही अपलोड केलं. त्यानंतर त्याला काही मुलींचे मेसेज येऊ लागले. दरम्यान मुंबईतील एका तरुणीनंही त्याला फ्रेंडशिपसाठी विचारलं. सुरुवातीचे काही दिवस दोघांत चांगलं बोलणं झालं. हेही वाचा- खंडणी दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल; कोल्हापूरात सासूची जावयाला धमकी पण त्यानंतर संबंधित तरुणीनं अश्लील चॅटींग करायला सुरुवात केली. एकेदिवशी तरुणीनं व्हिडीओ कॉल करून अंग प्रदर्शन करायला सुरुवात केली. यानंतर आरोपी तरुणीनं त्यालाही अंगप्रदर्शन करायला लावलं. पण तरुणानं नकार दिला. यानंतर दुसऱ्याचं दिवशी दिल्लीतील क्राइम ब्रॅंचमधून बोलतोय, असा फोन आला. तसेच मुलींशी अश्लील चॅंटीग केल्यामुळे तुझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामुळे तरुण घाबरुन गेला. यानंतर पुढील तीन दिवस सतत धमकीचे फोन येऊ लागले. बदनाम करण्याची धमकीही देण्यात आली. हेही वाचा- घरी सोडण्याच्या बहाण्यानं बसस्टॉपला थांबलेल्या तरुणीवर बलात्कार, नाशकातील घटना यानंतर आरोपी तरुणीनं संबंधित प्रकरण मिटवून घ्यायचं असेल, तर 20 हजार रुपये ऑनलाइन पाठव अशी मागणी केली. एवढे पैसे कोठून आणायचे या भीतीतून तरुणानं त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. याप्रकरणी मुंबईतील तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.