मराठी बातम्या /बातम्या /Viral /

डॉक्टरने दाखवलं मास्क वापरण्याचं प्रात्यक्षिक, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

डॉक्टरने दाखवलं मास्क वापरण्याचं प्रात्यक्षिक, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क कसा घालायचा? हे दाखवणारा डॉक्टरांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क कसा घालायचा? हे दाखवणारा डॉक्टरांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क कसा घालायचा? हे दाखवणारा डॉक्टरांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Suraj Yadav
मुंबई, 14 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. भारतातही लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मोदींनी लोकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. घराबाहेर पडणाऱ्यांनी मास्क घाला असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर मास्क कसा वापरायचा याचे प्रात्यक्षिक दाखवणारे अनेक व्हिडिओ आहेत. यात टिकटॉकवर एका डॉक्टरनं मास्क घालण्याची पद्धत दाखवली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, डॉक्टर मास्कला लावलेल्या दोन्ही रिबिन पुढे ठेवतात. त्यानंतर मास्क चेहऱ्याला लावतात आणि नंतर दोन्ही रिबिन मागे लावतात. त्याआधी सांगतात की, मास्क घालण्याआधी 30 सेकंदापर्यंत हात धुवा किंवा हातात ग्लोव्हज घाला. त्यानंतर बाहेरच्या बाजूने मास्क पकडा.
@toppodiatryHope this helps someone. ##masks ##correctway ##n95mask ##n95 ##coronavirus ##covid19 ##ppe ##personalprotectiveequipment♬ Cradles - Sub Urban
मास्कच्या आतल्या बाजुला हात लावू नका. नाक आणि तोंड मास्कने झाका. त्यानंतर स्ट्रेप्स पाठिमागे फिट करा. एक स्ट्रेप कानावरून तर दुसरी स्ट्रेप कानाखालून सेट करा. मास्क कसा वापरायचा याचा व्ह्डिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हे वाचा : धक्कादायक! डॉक्टरांनी उपचाराऐवजी रुग्णाची केली चपलांनी धुलाई, VIDEO VIRAL भारतात गुरुवारी कोरोनाचे 3722 रुग्ण आढळले आहेत. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 78003 इतकी झाली आहे. मृतांची संख्याही 2549 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 26235 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले असून रिकव्हरी रेट 33.63 टक्के आहे. हे वाचा : 4 वर्षांच्या चिमुरड्यानं केली ट्रम्प यांची नक्कल, VIDEO पाहून बसणार नाही विश्वास
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या