जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चुकून दरवाजा लॉक झाला तर काळजी करु नका, एक फुगा करेल तुम्हाला मदत कसं? पाहा Video

चुकून दरवाजा लॉक झाला तर काळजी करु नका, एक फुगा करेल तुम्हाला मदत कसं? पाहा Video

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

असाच एक हॅक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अतिशय सामान्य आणि रोजच्या समस्येवर एक मनोरंजक उपाय सांगण्यात आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जुलै : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. पण काही व्हिडीओ हे आपल्या सर्वांसाठी कामाचे देखील असतात. ज्यामध्ये आपल्याला माहिती मिळते, शिवाय काही टिप्स देखील मिळतात. जे आपल्या आयुष्यातील बरेच प्रॉब्लम्स सोडवायला सोयीचे असतात. असाच एक हॅक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अतिशय सामान्य आणि रोजच्या समस्येवर एक मनोरंजक उपाय सांगण्यात आला आहे. तुम्ही देखील पहा, तुमच्यासाठी देखील तो उपयोगी असू शकते. शिवाय तुमच्या मित्रांना देखील तुम्ही ही माहिती देऊ शकता ज्यामुळे तुम्ही कुठेही अडकणार नाही. आपल्या सर्वांसोबत कधी ना कधी असे घडते की आपण चुकून इंटरलॉक दरवाज बंद करतो आणि तो पुन्हा उघडत नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा चाव्या आपल्याकडे उपलब्ध नसतात तेव्हा आत जाणे किंवा तो दरवाजा उघडणं कठीण होतं. या परिस्थितीत, एक उपयुक्त हॅक व्हायरल झाला आहे, ज्याचा वापर केला जाऊ शकतो. ती गोष्ट वेगळी की त्यासाठीही काही प्रयत्न करावे लागतील. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बाथरूमचा दरवाजा आतून बंद आहे, तर बाहेरून तो उघडण्याचा कोणताही मार्ग नाही. अशा स्थितीत फुगा आणि नायट्रोजन गॅसच्या सिलेंडरची मदत घेतली जाते. प्रथम एक फुगा दरवाजाच्या घातला जातो आणि त्यात गॅस भरला जातो. गॅस भरल्यानंतर फुगा आधी बांधला जातो मग त्याला एक दोरी देखील बांधली जाते. दोरी बांधल्यानंतर या फुग्याला दुसऱ्या बाजूला सोडलं जातं. पण दोरीच्या सह्य्याने फुग्याला दरवाजाच्या लॉकपर्यंत आणलं जातं. यानंतर फुग्याला हँडलमध्ये अडकवुन लॉक उघडला जातो.

जाहिरात

व्हिडीओत हे सगळं पाहायला अगदी सोप्पी ट्रिक वाटत आहे. पण तो कितपत कामी येईल हे मात्र प्रयत्न केल्यावरच कळेल. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टेक्निकल_पर्सनेल नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे ज्यावर असंख्य लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी व्हिडीओ आपल्या मित्रांसोबत शेअर देखील केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात