मुंबई, 03 जुलै : रस्त्यावरुन प्रवास करताना किंवा चालताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. हे नियम नागरिकांच्या फायद्यासाठीच बनवलेले असतात. यासाठी पोलिसही सतर्क आहेतच शिवाय अनेक एक्सप्रेसवेवर तुम्हाला कॅमेरे लावलेले दिसतील, ज्यामध्ये सर्व काही रेकॉर्ड होत असतं. जेव्हा एखादी व्यक्ती ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघन करते किंवा जास्त वेगाने वाहन चालवते तेव्हा कॅमेरे आपोआप चलन तयार करतात आणि त्याच्या घराच्या पत्त्यावर पाठवतात. तसेच हे चलान ऑनलाईन देखील पाठवलं जातं. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला चलन भरावे लागते. रस्त्यावरील पांढरी सरळ आणि तुटलेल्या रेषेचा अर्थ काय? परंतू असे असले तरी देखील हे कॅमेरे नक्की कसे काम करतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. हे कॅमेरे सुपर हाय रिझोल्युशन (2 मेगापिक्सेल) कॅमेऱ्यांसह वापरले जातात, जे 60 डिग्री कव्हरेजचे आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे या कॅमेऱ्यांपासून वाचू शकत नाहीत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनांचा वेग शोधणे सोपे जाते. हे कॅमेरे वाहतूक नियंत्रण कक्षातून चालवले जातात. या कॅमेऱ्यांसाठी खास डेटा एन्क्रिप्शन सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. तसेच कॅमेऱ्याने काढलेले फोटो आणि व्हिडीओ सुरक्षित ठेवण्यात आले आहेत, जेणेकरुन काही वाद झाल्यास ते न्यायालयासमोर मांडता येतील. Ajab Gajab : बिअर आणि स्नॅक्ससाठी रेस्टॉरंटने आकारले इतके रुपये, बिल पाहून व्यक्ती शॉक ई-चालन कसे पाठवले जाते? एखाद्या व्यक्तीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर, वाहतूक नियंत्रण कक्षाकडून तुमच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे ई-चलन पाठवले जाते. विहित मुदतीत चलनाची रक्कम जमा न केल्यास वाहन जप्त केले जाऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वाहतूक नियंत्रण कक्ष 24x7 कार्यरत आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळीही तुम्ही या कॅमेऱ्यांपासून सुटण्याची शक्यता नाही. ई-चलान तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी, त्याला दोन टप्प्यांतून जावे लागते. प्रथम, रहदारीच्या नियमांच्या उल्लंघनाची स्वयंचलित पुष्टी केली जाते आणि नंतर ते मॅन्युअली तपासले जाते, जेणेकरून कोणतीही त्रुटी नाही. त्यामुळे तुम्हाला एकदा का गाडीचा चलान आला की तो भरल्याशिवाय पर्याय नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.