नवी दिल्ली 27 जुलै : एक काळ असा होता ज्यात राजे-महाराजे यांच्याकडे हत्ती, घोडे, पालखी आणि इतर अनेक साधनं असायची. मात्र, काळ बदलला, भांडवलशाहीने जगात दार ठोठावले तेव्हा करोडपती, अब्जाधीश अशा सुविधा उपभोगू लागले. काळासोबत त्यांना त्यांचं खाजगी जेट मिळू लागलं. भारतातही असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे करोडो रुपयांची खाजगी विमाने आणि कार आहेत. परंतु तुम्ही भारतात कोणाकडे खाजगी ट्रेन असल्याचं ऐकलं आहे का? तुम्ही हे ऐकलं नसेल कारण भारतातील रेल्वे सरकारच्या अखत्यारीत आहे, ती सरकारी मालमत्ता आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की अशी एक व्यक्ती आहे जी एकमेव भारतीय आहे ज्याच्याकडे ट्रेन आहे. रेल्वेच्या एका मोठ्या चुकीमुळे तो ट्रेनचा मालक झाला आणि आता घरी बसून त्या ट्रेनमधून मिळणाऱ्या कमाईचा वाटा उचलतो. आम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत त्याचं नाव संपूर्ण सिंह असून तो लुधियानाच्या कटाना गावचा रहिवासी आहे. एके दिवशी तो अचानक दिल्ली-अमृतसर स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेस या दिल्लीहून अमृतसरला जाणाऱ्या ट्रेनचा मालक बनला. त्यानंतर तो प्रसिद्धीझोतातही आला. Viral News: चॉकलेट चोरणं पडलं महागात; 32 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा त्याचं झालं असं की 2007 मध्ये लुधियाना-चंदीगड रेल्वे लाईनच्या कामाच्या वेळी रेल्वेने शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या होत्या. त्यावेळी 25 लाख रुपये प्रति एकर या दराने जमीन संपादित करण्यात आली होती. पण हे प्रकरण तेव्हा फसलं जेव्हा जवळच्याच एका गावात 71 लाख रुपये प्रति एकर दराने जमीन संपादित करण्यात आली. यामुळे संपूर्ण सिंह दुखावले आणि तक्रार घेऊन कोर्टात पोहोचले. न्यायालयाने दिलेल्या पहिल्या आदेशात नुकसान भरपाईची रक्कम 25 लाखांवरून 50 लाख करण्यात आली होती, मात्र नंतर ती 1.47 कोटींहून अधिक करण्यात आली. पहिली याचिका 2012 मध्ये दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने उत्तर रेल्वेला 2015 पर्यंत पैसे भरण्याचे आदेश दिले होते. रेल्वेने केवळ 42 लाख रुपये दिले, उरलेले 1.05 कोटी रुपये दिले नाहीत. जेव्हा रेल्वे रक्कम भरण्यास असमर्थ ठरली तेव्हा 2017 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जसपाल वर्मा यांनी लुधियाना स्थानकावर ट्रेन आणि स्टेशन मास्तरचे कार्यालयही जप्त करण्याचे आदेश दिले. संपूर्ण सिंग वकिलांसह स्टेशनवर पोहोचले आणि ट्रेन जप्त करण्यात आली. म्हणजेच आता ते ट्रेनचे मालक झाले होते. अशा प्रकारे तो भारतातील एकमेव व्यक्ती बनला जो ट्रेनचा मालक होता. मात्र, सेक्शन इंजिनीअरने न्यायालयीन अधिकाऱ्यामार्फत अवघ्या 5 मिनिटांत गाडी सोडवून घेतली गेली. मात्र, हे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.