रोम, 13 ऑक्टोबर : पर्यटन म्हटलं की सुंदर पर्यटनस्थळं पाहण्यासोबतच तिथले खाद्यपदार्थ चाखणं, तिथली संस्कृती समजून घेणं. पण सध्या बऱ्याच पर्यनटनस्थळी काहीतरी तुफानी करण्याची संधी मिळते. रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, बंजी जम्पिंग असे बरेच अॅडवेंचर गेम्स
(Adventure Games) खेळायला मिळतात. धाडसी किंवा उत्साही पर्यटक हे करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. पण जीव धोक्यात टाकणारे हे खेळ चांगलेच महागात पडू शकतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
आकाशात झेपावलेला हॉट एअर बलून
(Hot Air Balloon) हवेतच क्रॅश झाला, त्यानंतर त्यातील प्रवासीही खाली पडले. इटलीमध्ये
(Italy) ही धक्कादायक घटना घडली आहे
(Tourist Places In Italy). 11 सप्टेंबरला घडलेल्या या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोमोमध्ये काही पर्यटक हॉट एअर बलूनमध्ये बसून उंच आकाशात उडण्याचा आनंद घेत होते. तेव्हा हवेत एअर बलूनचा बॅलेन्स बिघडला आणि त्यानंतर बलून तिथं असलेल्या झा़डांमधून जात म्युझियमला धडकला. माहितीनुसार एअर बलून जास्त उंच केला नव्हता. त्यामुळे झाडांच्या फांद्यांना हा बलून अडकला आणि ही दुर्घटना झाली. यानंतर बलूनला असलेलं बास्केट म्युझियमजवळ पूर्णपणे उलटं झालं आणि त्यातील प्रवासी खाली पडले.
हे वाचा - कारसोबत रेस लावणं तरुणाला भोवलं; बाईकसह हवेत उडाला अन्..., पाहा Shocking Video
डेली मेलच्या रिपोर्टनुसार जेव्हा हा बलून म्युझियमच्या छतावर आपटला तेव्हा म्युझियम बंद होतं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर अग्निशमन दलाच्या टीमने बलूनला खाली उतरवलं. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही. काही दिवसांपूर्वीच एका तरुणीचा बंजी जम्पिंग करताना मृत्यू झाला. यात व्यक्तीच्या कमरेला रस्सी बांधली जाते आणि यानंतर या व्यक्तीला उंचावरून खाली सोडलं जातं. यानंतर व्यक्ती हवेतच या रस्सीच्या सहाय्याने लटकत राहातो.
हे वाचा - आधी पेट्रोल भरलं, नंतर कर्मचाऱ्यालाही गाडीत कोंबलं; अपहरणाचा LIVE VIDEO
कजाकिस्तानमधील
(Kazakhstan) 33 वर्षीय येवजीनिया लिओन्तिया आपल्या पती आणि मित्रांसोबत कारागांडा शहरातील एका हॉटेलमध्ये गेली होती. याच्या छतावर बंजी जंपिंग
(Bungee Jumping) करत होती. तिचा पती व्हिडिओ शूट करत होता. तिनं खाली उडी घेतली मात्र दोरी व्यवस्थित नसल्यानं हवेत लटकण्याऐवजी ती थेट जमिनीवर कोसळली आणि एका भिंतीला जाऊन धडकली. खाली उपस्थित असलेल्या लोकांनी तिला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. ती जखमी झालेली होती. लगेचच तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र सर्जरीदरम्यानच तिचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.