जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! घोडाही असं करू शकतो? VIRAL VIDEO पाहून सर्वांनाच बसला धक्का

Shocking! घोडाही असं करू शकतो? VIRAL VIDEO पाहून सर्वांनाच बसला धक्का

घोड्याचं असं रूप तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

घोड्याचं असं रूप तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

घोड्याचं असं रूप तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 22 जुलै : घोडा ज्याला शाकाहारी प्राणी समजलं जातं. एरवी गवत, हरभरा, धान्य खाताना तो दिसतो. पण अशाच घोड्याने चक्क एका कोंबडीच्या पिल्लाला खाल्लं आहे. आईसमोरच तिच्या पिल्लाला घोड्याने जिवंत गिळलं आहे. घोड्याचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. घोड्याचं असं रूप तुम्हीही कधीच पाहिलं नसेल. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला घोडा, कोंबडी आणि कोंबडीची तीन पिल्लं दिसत आहेत. पाहताना व्हिडीओ अगदी सामान्य वाटतो. पण पुढे जे घडतं ते पाहून धक्काच बसतो. कोंबडीच्या पिल्लांकडे तोंड नेणारा घोडा असं काही करू शकतो, याचंच आश्चर्य वाटतं. खरंतर व्हिडीओ पाहिल्यानंतर आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही.

News18लोकमत
News18लोकमत

घोडा कोंबडीच्या पिल्लांकडे तोंड नेतो. कोंबडीही तिथंच आसपास असते. घोड्याचं तोंड पिल्लांजवळ आहे, त्यामुळे आपल्यालाही तो या पिल्लांशी खेळतो आहे असचं वाटतं. आता घोड्यापासून आपल्या पिल्लांना तसा काही धोका नाही हे कोंबडीला माहिती आहे, त्यामुळे जरी घोडा पिल्लांजवळ असला तरी कोंबडी बिनधास्त असते. ती थोड्या वेळासाठी आपल्या पिल्लांपासून थोडी दूर जाते आणि त्याचवेळी घोडा संधी साधतो. जंगलाच्या राजाच्या हद्दीत घुसली मगर, सिंहाची शिकार पळवण्याचा प्रयत्न; पुढे काय घडलं पाहा VIDEO तीन पिल्लांपैकी घोडा एका पिल्लाला आपल्या तोंडात घेतो. घोडा कोंबडीच्या पिल्लाला जिवंत गिळतो, त्याला खाताना तो दिसतो. आपल्या पिल्लाला घोड्याच्या जबड्यात पाहताच त्याला वाचवण्यासाठी आई तिथं येते. ती घोड्यावर हल्ला करते. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. घोड्याने पिल्लाला गिळलेलं असतं. व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण हैराण आहे. घोडा असं काही करू शकतो, यावर कुणाचा विश्वासच बसत नाही आहे. खरंच घोड्याने कोंबडीच्या पिल्लाला खाल्लं का असा प्रश्न एका युझरने विचारला आहे. तर काही युझर्सनी व्हिडीओ शूट करणाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे. घोड्याला तिथून हाकललं असतं तर कोंबडीचं पिल्लू वाचलं असतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. Viral Video: प्रवासी उभे होते अन् कुत्रा सीटवर झोपलेला; मग लोकांनी जे केलं ते पाहून व्हाल चकित घोड्याचा हा धक्कादायक व्हिडीओ @TheBrutalNature ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात