नवी दिल्ली 22 जुलै : बस असो किंवा लोकल ट्रेन, बसण्यासाठी जागा पकडण्यासाठी प्रवाशांची खूपच धावपळ होते. बसमध्ये तर जागा मिळवण्यासाठी अगदी खिडकीतून बसमध्ये शिरणं किंवा सीटवर रुमाल, बॅग टाकणं असे प्रकार केले जातात. अनेकदा जागेवरून प्रवाशांमध्ये भांडणंसुद्धा होतात. पण परदेशातल्या एका बसमधला असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, की जो पाहिल्यानंतर बस, रेल्वेमध्ये जागेसाठी भांडण करणाऱ्या प्रवाशांना स्वतःचीच लाज वाटेल. एक कुत्रा बसच्या सीटवर झोपला असल्यानं प्रवासी ती सीट सोडून उभे राहिले असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतचं वृत्त दिलंय. मेट्रो असो, लोकल ट्रेन असो किंवा बस… सर्वच ठिकाणी सीटसाठी प्रवाशांमध्ये भांडण होत असतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये प्रवासी जागेवरून भांडताना दिसतात. अलीकडेच, मुंबई लोकलमध्ये रिकाम्या जागेवरून महिलांनी भांडण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दुसरीकडे ट्विटरवर एका बसमधल्या कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून तो अनेकांना विचार करायला भाग पाडतोय.
Although the wagon was crowded and he was occupying 2 seats, nobody disturbed his rest❣️
— Stefano S. Magi (@myworld2121) October 5, 2022
📹via Karen Olave
🎵Laurasia Mattingly•Choose Kindness pic.twitter.com/mboB6Nj4KC
व्हिडिओमध्ये नेमकं काय? ट्विटरवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 14 सेकंदांचा आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला बसमध्ये असलेली प्रवाशांची गर्दी दाखवण्यात आलीय. त्यानंतर कॅमेरा हळूहळू प्रवाशांमधून एका कुत्र्याकडे वळतो. तो सीटवर आरामात झोपला आहे. बसमध्ये जागा न मिळाल्याने उभ्या असलेल्या प्रवाशांना त्यांच्या समोरच्या सीटवर कुत्रा झोपलेला दिसतोय; पण त्याला कोणीही त्रास देत नाही. म्हणजेच कोणताही प्रवासी कुत्र्याला हाकलून सीटवर बसण्याचा प्रयत्न करत नाही. प्रवाशांची ही माणुसकी पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. Viral Video: चिमुकलीला समुद्रात पोहायला शिकवत होते वडील; पाण्यात टाकताच भयानक घडलं व्हिडिओ कुठला? हा व्हिडिओ ट्विटरवर @myworld2121 या ट्विटर हँडलवर 5 ऑक्टोबर 2022 ला शेअर करण्यात आलाय. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की ‘बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती आणि तो (कुत्रा) 2 जागा व्यापून सीटवर आरामात झोपला होता. तरीही त्याला कोणीही झोपेतून उठवून त्रास दिला नाही.’ या व्हिडिओला आतापर्यंत 45 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 3 हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत. यासोबतच युझर्स व्हिडिओवर विविध कमेंट्स नोंदवत आहेत. एका युझरने लिहिलंय की, या व्हिडिओमुळे त्याचा दिवस चांगला गेला. काही युझर्सनी लिहिलंय, की ‘गाडीतले प्रवासी खूप छान माणसं आहेत.’ काही युझर्सच्या मते, हे एक सुखद दृश्य आहे. हा व्हिडिओ दक्षिण अमेरिकेतल्या चिली या देशातला असल्याचा दावा करण्यात येतोय.