मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO VIRAL हॉर्स शो दरम्यान पोलिसाचा घोडा उधळला; बॅरिकेड तोडून थेट घुसला प्रेक्षकांत

VIDEO VIRAL हॉर्स शो दरम्यान पोलिसाचा घोडा उधळला; बॅरिकेड तोडून थेट घुसला प्रेक्षकांत

एका पोलिसाचा घोडा अचानक उधळला आणि वेगाने धावत सुटला. बॅरिकेड तोडून थेट प्रेक्षकांत घुसला. या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका पोलिसाचा घोडा अचानक उधळला आणि वेगाने धावत सुटला. बॅरिकेड तोडून थेट प्रेक्षकांत घुसला. या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका पोलिसाचा घोडा अचानक उधळला आणि वेगाने धावत सुटला. बॅरिकेड तोडून थेट प्रेक्षकांत घुसला. या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अहमदाबाद, 1 जानेवारी : एकसे एक देखण्या घोड्यांच्या प्रेक्षणीय कार्यक्रमात अचानक अघटित झालं. घोडेस्वारीचं प्रात्यक्षित दाखवत असताना घोडा उधळला. घोडेस्वाराला न जुमानता घोडा प्रेक्षकांच्या दिशेनं दौडत निघाल्याचा VIDEO व्हायरल झाला आहे. अहमदाबादच्या प्रसिद्ध कांकरिया फेस्टिवलमध्ये हॉर्स शो दरम्यान ही घटना घडली.

गुजराती राजधानीत दरवर्षी कांकरिया कार्निवल हा महोत्सव भरतो. कांकरिया लेक परिसरात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. 25 ते 31 डिसेंबरदरम्यान हा महोत्सव झाला. त्यात एक दुर्घटना घडली.

कांकरिया कार्निवल दरम्यान पौलीस दलाचा हॉर्स शो आयोजित करण्यात आला होता. एक पोलीस घोडसवारीची प्रात्यक्षिकं दाखवत होता. मोकळ्या मैदानावर शो सुरू होता. मैदानाला चारही बाजूंनी कठडे उभारले होते. रेलिंग पलीकडे प्रेक्षक होते. पण एका पोलिसाचा घोडा अचानक उधळला आणि वेगाने धावत सुटला.

उधळलेल्या घोड्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न घोडेस्वार पोलीस करत होता. पण त्याला न जुमानता घोडा बॅरिकेड तोडून थेट प्रेक्षकांत घुसला. या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॅरिकेडच्या पलिकडे थेट रस्ता होता. वाहत्या रस्त्यापर्यंत हा घोडा धावत गेला. या घटनेत दोन- तीन जण किरकोळ जखमी झाल्याचं वृत्त आहे.

------------------------

अन्य बातम्या

गँगवॉर भडकलं, सूर्या मराठी गँगच्या माणसाची तलवारीने हत्या CCTVमध्ये कैद

युद्ध झालं तर? अणुबॉम्बचा हल्ला टाळण्यासाठी भारत आणि पाकने घेतला मोठा निर्णय

सेल्फी घेत असतानाच अर्जुन कपूरला मलायकाने केलं Kiss; पाहा PHOTO

First published:

Tags: Ahmedabad, Viral video.