नवी दिल्ली 01 जानेवारी : भारत(India) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) तणाव हा कायम असतो. त्यामुळे युद्धाचा सतत धोकाही व्यक्त केला जातो. काश्मीरमुद्यावरून (Kashmir) तर गेल्या काही दिवसांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालाय. पाकिस्तान दहशतवाद्यांना हाताशी धरून भारतात आपल्या कारवाया करत असते. त्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध हे गेल्या अनेक दशकांपासून ताणलेले आहेत. त्यातच दोनही देश अण्वस्त्रधारी असल्याने धोका जास्तच वाढलाय. जगभरातून त्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत असते. जबाबदार देश म्हणून भारताने आम्ही पहिल्यांदा हल्ला करणार नाही असा निर्णय घेतलाय. मात्र पाकिस्तानकडू कायम अणू हल्ल्याची धमकी दिली जाते या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानने दोन्ही देशांच्या अण्विक प्रतिष्ठानांची यादी एकमेकांना सादर केलीय.
भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश झाल्यानंतर युद्ध झालं तर काय करायचं यावर चिंता व्यक्त होत होती. जपानवर झालेल्या अणुहल्ल्याचे भीषण परिणाम अवघ्या मानवाजातीवरच झाले आहेत. हे जगाने पाहिलं त्यामुळे एखाद्या देशांकडे अणुबॉम्ब असले तरी ते प्रत्यक्ष वापरले जात नाहीत. दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास अणुकेंद्र असलेल्या ठिकाणी हवाई हल्ले केले जावू नयेत असे संकेत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भारत आणि पाकिस्तानने 31 डिसेंबर 1988 मध्ये एक करार केला होता. 27 जानेवारी 1991 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली.
काँग्रेसला धक्का, मंत्रिपद नाकारल्याने दिग्गज आमदार सोडणार पक्ष
या करारानुसार दोन्ही देश 31 डिसेंबरला आपल्याकडे असलेल्या आण्विक प्रतिष्ठान आणि केंद्राची माहिती एकमेकांना देत असतात. या अण्विक केंद्रांची माहिती दोन्ही देशांकडे असावी त्यामुळे युद्ध झालं तरी ते महासंहारक होणार नाही अशी काळजी घेतली जाते. गेल्या 29 वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. दिल्ली आणि इस्लामाबाद इथं असलेल्या दुतावासांमार्फेत ही यादी दोन्ही देश एकमेकांना सुपूर्द करतात.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.