रांची, 20 डिसेंबर : हत्ती (Elephant video) अवाढव्य असला तरी तितकाच तो शांतही असतो. इतर वन्य प्राण्यांप्रमाणे तो आक्रमकपणे हल्ला करत नाही (Elephant attack video). फक्त जंगलातच नाही तर एरवी असेही आपल्याला कधी ना कधी हत्ती पाहायला मिळतात. त्यामुळे जंगलात फिरायला गेल्यावरही ज्याप्रमाणे सिंह, वाघ, बिबट्या या प्राण्यांना पाहून भीती वाटते तितकी भीती हत्तींना पाहून नाही वाटत. पण हाच शांत हत्ती जर भडकला तर मात्र त्याच्या समोर असणाऱ्या व्यक्तीचं काही खरं नाही. सध्या अशाच एका चवताळलेल्या हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. एका हत्तीने एका तरुणावर खतरनाक हल्ला केला आहे (Elephant attack in aasam video). हत्तीने एका तरुणाला पळवून पळवून त्याच्यावर हल्ला केला आहे. ही धक्कादायक घटना घडली आहे, ती आसाममध्ये. आसाममधील हत्तीच्या या भयंकर हल्ल्याच्या व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटाच येईल.
#WATCH | A 30-year-old man was chased and attacked by a wild elephant at a village in Tamarhat area of Dhubri district of Assam on December 18
— ANI (@ANI) December 20, 2021
"The man was admitted to a hospital for treatment and the elephant was chased towards jungle area," a forest officer said pic.twitter.com/YsRvZAUe1h
व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती पळतो आहे आणि त्याच्या मागे एक भलामोठा संतप्त हत्ती वेगाने धावत येतो आहे. व्यक्ती हत्तीपासून आपला जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत धरून पळताना दिसतो आहे. तो इतक्या वेगाने पळतो आणि अचानक त्याचा तोल ढासळून तो जमिनीवर कोसळतो. कसाबसा उठून तो पुन्हा पळतो पण तो पुन्हा पडतो. अखेर हत्ती त्या व्यक्तीला गाठतोच. जमिनीवर पडलेल्या या व्यक्तीवर हत्ती हल्ला करतो. व्हिडीओ पाहूनच धडकी भरते. हे वाचा - VIDEO - बापरे! तोंडात पाय धरला आणि…; चक्क कासवाने केला कुत्र्यावर खतरनाक हल्ला एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ही घटना आसामच्या धुबरी जिल्ह्यातील आहे. तमारहाट परिसरातील शेतात काही लोक 18 डिसेंबरला काम करत होते. यावेळी जंगलातून एक चवताळलेला हत्ती आला आणि त्याने 30 वर्षांच्या या व्यक्तीवर हल्ला केला. हत्तीच्या हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. ज्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी हत्तीला पकडून पुन्हा जंगलात सोडलं आहे.