बेपत्ता कुत्रा गॅरेजच्या भिंतीत कसा पोहोचला? अग्निशमन दलानं केली सुटका

या कुत्रीची अग्निशमन दलानं(Firefighters) सुखरूप सुटका केली, त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

या कुत्रीची अग्निशमन दलानं(Firefighters) सुखरूप सुटका केली, त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

  • Share this:
    मुंबई 22 जुलै: जगभरात अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात. अनेकदा त्यामागील गूढ उलगडत नाही. अतिशय कठीण परिस्थिती असली तरी काहीतरी जादू व्हावी तसा त्यातून मार्ग निघतो. कठीण संकटातून जीव वाचतो. अशावेळी देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. नुकतीच अशाच एका चमत्काराची प्रचीती अमेरिकेतील(USA) एका कुटुंबाला आली आहे. त्यांचा पाच-सहा दिवसांपासून बेपत्ता असलेली कुत्री (Dog) दोन भिंतीमधील फटीत जिवंत सापडली आहे. अशा प्रकारे इतके दिवस या ठिकाणी अडकूनही ती जिवंत राहिली हे अत्यंत आश्चर्यजनक असून या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. या कुत्रीची अग्निशमन दलानं(Firefighters) सुखरूप सुटका केली, त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हज यात्रेत घडला इतिहास; मक्केत पहिल्यांदाच महिला रक्षक तैनात अमेरिकेतील ओहायोमधील(Ohio) सिनसिनाटी(Cincinnati) इथं ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. इथल्या एका कुटुंबातील अतिशय लाडकी असलेली गर्टी(Garty) नावाची कुत्री 13 जुलै रोजी अचानक बेपत्ता झाली. खूप शोध घेऊनही पाच-सहा दिवसात तिचा काहीही थांगपत्ता लागला नव्हता. ती कुठेतरी निघून गेली असावी असा समज या कुटुंबाचा झाला. मात्र एक दिवस अचानक घरातल्या भिंतीमधून कुत्र्याच्या रडण्याचा, विव्हळण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं, त्यांनी ताबडतोब सिनसिनाटी अग्निशमन दलाला(Cincinnati Fire Fighter Department- CFD) पाचारण केलं. अग्निशमन दलाचे जवान तिथं आले आणि त्यांनी शोध घेतला तेव्हा गॅरेजच्या भिंतीतून हा आवाज येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ती भिंत फोडली आणि बघितलं तर आत गर्टी जिवंत अवस्थेत होती. तत्काळ तिला बाहेर काढण्यात आलं. अशा अडचणीच्या ठिकाणी पाच-सहा दिवस अडकूनही गर्टी जिवंत असल्याचं बघून सर्वांनाच खूप आनंद झाला. त्यामुळे संपूर्ण घरच आनंदून गेलं. Toll वाचवण्यासाठी घेतला शॉर्टकट; Bolero ची अवस्था पाहून धक्काच बसेल, पाहा VIDEO अग्निशमन दलानं(CFD) फेसबुकवर याबाबतची पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला. गर्टीच्या सुखरूप सुटकेचा हा व्हिडिओ बघून युझर्सनी अग्निशमन दलाचं भरभरून कौतुक केलं असून, एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. गर्टीच्या सुटकेचा हा व्हिडिओ @GoodNewsCorres1 या ट्विटर युझरनंही ट्विटरवर शेअर केला असून त्यालाही युझर्सचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ट्विटरवर या व्हिडिओला आतापर्यंत तीन हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि दोनशेपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
    First published: