हज यात्रेत घडला इतिहास; मक्केत पहिल्यांदाच महिला रक्षक तैनात

इस्लाम धर्माचं जन्मस्थान असलेलं सौदी अरेबियातलं (Saudi Arabia) मक्का हे ठिकाण जगभरातल्या मुस्लिम धर्मीयांचं श्रद्धास्थान आहे.

इस्लाम धर्माचं जन्मस्थान असलेलं सौदी अरेबियातलं (Saudi Arabia) मक्का हे ठिकाण जगभरातल्या मुस्लिम धर्मीयांचं श्रद्धास्थान आहे.

  • Share this:
    मुंबई 22 जुलै: आजच्या आधुनिक काळातही अनेक देशांमध्ये महिलांवर अनेक बंधनं आहेत. विशेषतः मुस्लिम देशांमध्ये(Islamic Country) हे प्रमाण अधिक दिसून येतं; मात्र आता तिथेही बदलाचे वारे वाहू लागल्याचं दिसत असून, तिथल्या महिलाही आपल्या कर्तृत्वानं नवी क्षितिजं काबीज करू लागल्या आहेत. याचंच एक अनोखं उदाहरण हज यात्रेदरम्यान(haj Yatra) पाहायला मिळालं. मक्केत (Mecca) चक्क एका महिलेला सुरक्षारक्षक म्हणून तैनात करण्यात आलं. या महिलेचं नाव मोना असं आहे. (First Woman Security Guard In Mecca) इस्लाम धर्माचं जन्मस्थान असलेलं सौदी अरेबियातलं (Saudi Arabia) मक्का हे ठिकाण जगभरातल्या मुस्लिम धर्मीयांचं श्रद्धास्थान आहे. दर वर्षी हज यात्रेसाठी इथे लाखो लोक येतात. त्या वेळी भाविकांची सुरक्षा आणि देखभाल यासाठी सुरक्षारक्षकांची मोठी फौज तैनात केली जाते. यंदा प्रथमच यामध्ये महिला सैनिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात मोनाचा समावेश आहे. धर्माची, देशाची आणि अल्लाहच्या भक्तांची सेवा करणं ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मोनानं व्यक्त केली आहे. Toll वाचवण्यासाठी घेतला शॉर्टकट; Bolero ची अवस्था पाहून धक्काच बसेल, पाहा VIDEO मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मोनानं आपल्या वडिलांच्या कारकीर्दीमुळे प्रभावित होऊन संधी मिळताच सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आणि ती सौदीतल्या पहिल्या महिला सैन्य तुकडीत सामील झाली. एप्रिलपासून मक्का आणि मदीना या तीर्थस्थळी येणार्‍या यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी डझनभर महिला सैनिक तैनात करण्यात आले आहेत. त्यात तिचाही समावेश आहे. मोना मक्का इथल्या ग्रँड मशिदीतल्या (Grand Masque) सुरक्षा व्यवस्थेचा भाग आहे. इथे येणाऱ्या हज यात्रेकरूंना सर्व सुविधा मिळतील याची जबाबदारी मोनाकडे आहे. अंगावर काटा येईल हा VIDEO पाहून! धावत्या कारमध्ये तरुण करत होता जीवघेणे स्टंट पारंपरिक कायद्यांनुसार चालणाऱ्या सौदी अरेबियात आता अनेक बदल होत असून, इथे आता महिलांसाठी पूर्वी बंदी असलेली अनेक क्षेत्रं खुली करण्यात येत आहेत. याचंच हे एक उदाहरण आहे. सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून सौदीतल्या अनेक सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर जोर दिला आहे. या सुधार प्रक्रियांना ‘व्हिजन 2030’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याअंतर्गत महिलांवरचे अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. यामध्ये आता प्रौढ महिलांना कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय कोठेही जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कौटुंबिक प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार महिलांना देण्यात आला आहे. महिलांवर अनेक निर्बंध असणाऱ्या देशातले हे बदल महिलांसाठी अतिशय सुखद असून, त्यांच्या आकांक्षांना आता पंख मिळणार आहेत. त्यामुळे मोनासारख्या अनेक मुली आपल्या कतृत्वानं जगाचे डोळे दिपवू शकणार आहेत.
    First published: