मुंबई, 08 डिसेंबर : आपल्या लग्नात (Wedding video) आपण हटके दिसायला हवं यासाठी प्रत्येक नवरी प्रयत्न करत असते. काहीतरी वेगळं करण्याचा ती प्रयत्न करते. सध्या अशाच एका नवरीचा व्हिडीओ (Bride video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. जी चक्क लेहंना न घालताच फेऱ्यांसाठी पोहोचली (Bride without lehanga). नवरीला तशा अवतारात पाहून पाहुणेही शॉक झाले.
नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. विटी वेडिंग नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या नवरीचं नाव मुद्रा भगत आहे. तिचे फेरे होणार होते आणि त्यासाठी पाहुणे तिची वाटत पाहत होते. फेऱ्यांसाठी जशी मुद्रा बाहेर आली तसं तिला पाहून सर्वांना धक्काच बसला.
इतर नवरींप्रमाणे मुद्राही छान नटली होती. तिने दागिने घातले होते, हातात चुडा भरला होता, लाल रंगाची डिझायनर चोली घातली होती आणि डोक्यावर दुप्पटाही घेतला होतो. पण तिने लेहंगा मात्र घातला नाही. लेहंग्याऐवजी मुद्रा फक्त जिन्सवरच बाहेर आली.
हे वाचा - नवऱ्याचं बायकोवरील प्रेम इतकं उतू गेलं की सर्वांसमोर नको तेच घडलं; पाहा VIDEO
आता ती घाईघाईत चुकून लेहंगा घालायला विसरली का तर नाही. व्हिडीओ तुम्ही ऐकाल तर नवरीबाई सांगते, मला लेहंगा घालायचा नाही. मला असंच जायचं आहे. मुद्राला जड अशा लेहंग्यात नव्हे तर आरामदायी जिन्समध्ये फेरे घ्यायचे आहेत. तिची ही इच्छा ऐकून सर्वजण हसू लागतात. तिचा एक नातेवाईक तर तिला हाताला धरून मंडपात नेण्याची अॅक्टिंगही करताना दिसतो.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी एका नवरीने आपल्याला नाइटसूटमध्ये फेरे घ्यायचे आहेत, अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या नवरीने तर चक्क जीन्समध्ये फेरे घेण्याची आपली इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला.
हे वाचा - टेस्टी म्हणून कपलने रेस्टॉरंटमध्ये खा खा खाल्लं; पदार्थाचं सत्य कळताच बसला धक्का
हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सनी या नवरीचं समर्थन केलं आहे. तुझं लग्न आहे तुला हवं तसं तू दिसू शकते, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. तर काहींना मात्र तिचं असं वागणं आवडलं नाही आहे. इतकं तर अमेरिकेतही होत नाही. आपलं ट्रेडिशन आपण असं का खराब करायचं, असं म्हणत तिच्यावर टीका केली आहे. तुम्हाला नवरीबाईचा हा गेटअप कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Viral, Viral videos, Wedding, Wedding video