जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कोहिनूरसहीत जगातील 7 दुर्मिळ हिऱ्यांची यादी, त्यांचा इतिहास फारच रंजक

कोहिनूरसहीत जगातील 7 दुर्मिळ हिऱ्यांची यादी, त्यांचा इतिहास फारच रंजक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हिऱ्याबद्दल काही Unknow Facts, सर्वात महागड्या हिऱ्यांची नावं तुम्हाला माहितीयत का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : जगभरात लोक सोन्याला जास्त महत्व देतात. धार्मिक दृष्याही सोन्याला खूप जास्त मान आहे. पण असं असलं तरी देखील हिऱ्याची किंमत सोन्याहून जास्त आहे. कोळश्याच्या खाणीत हिरा सापडतो. त्याला घासून त्याला पैलू दिले जातात. ज्यानंतर त्याची किंमत आणि रुप आणखी वाढतं. खऱ्या हिऱ्याला फारच कमी लोकांनी पाहिलं असेल. पण कधी विचार केलाय का की जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याचं वजन किती असेल? तसेच त्याची किंमत किती असेल आणि तो कोणाकडे असेल? खरंतर हा एक जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. एखादा उत्साही व्यक्ती या गोष्टीच्या नक्कीच शोधात असेल किंवा त्याला असे प्रश्न पडले असतील. चला याबद्दल जाणून घेऊ.

News18लोकमत
News18लोकमत

आज हिऱ्यांचा बाजाराने कोट्यवधी रुपयांचा पल्ला गाठला आहे. यामध्ये काही हिरे इतके महाग असतात की त्यांच्या किमतीत संपूर्ण शहर बांधता येते. तर अनेक हिरे आकाराने लहान असतात, परंतु त्यांची वैशिष्ट्ये त्यांना अद्वितीय बनवतात. इतिहास पाहिला तर हिऱ्याच्या शोध २५०० वर्षांपूर्वीचा आहे. सुरुवातीच्या काळात कटिंग आणि पॉलिशिंग सुविधा नसल्यामुळे, हिरा त्याच्या नैसर्गिक स्वरूपात ठेवला जायचा, तसेच या हिऱ्याला राजा आणि सम्राटांच्या मुकुटावर जागा मिळाली होती. आधुनिक युगातील पहिली हिऱ्याची खाण गोदावरी आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यांमधील गोलकोंडा परिसरात सापडली. 1800 च्या सुमारास या भागात हिऱ्याची पहिली खाण सापडली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील हिऱ्यांच्या खाणींची माहिती मिळाली. हिरे पृथ्वीच्या आत तयार व्हायला लाखो वर्षे लागतात. बहुतेक हिरे पृथ्वीच्या 150 ते 250 किलोमीटर खोलीवर तयार होतात. हे फक्त जगाच्या काही भागात आढळते, म्हणून दुर्मिळ पदार्थांच्या श्रेणीत येते. हिऱ्यांचा वापर दागिने आणि सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. डायमंड हा कार्बनचा रासायनिकदृष्ट्या शुद्ध प्रकार आहे. त्यात भेसळ अजिबात नसते. जिभेने हिरा चाटला तर काय होतं? खरंच माणूस मरतो का? हिऱ्याबद्दल काही Unknow Facts जर हिरा ओव्हनमध्ये 763 डिग्री सेल्सिअस तापमानात गरम केला तर तो जाळून कार्बन डायऑक्साइड तयार होईल, एवढंच काय तर त्याची राख देखील शिल्लक राहणार नाही. ज्यामुळे हे सिद्ध होते की हिरे 100% कार्बनपासून बनतात. हिऱ्याची किंमत किती असू शकते? हिरा हा पृथ्वीवर आढळणारा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ मानला जातो. हिरे कॅरेटमध्ये मोजले जातात. हिरे बाजाराची आकडेवारी पाहिली तर 1 कॅरेट हिऱ्याची किंमत किमान 1 लाख आणि कमाल 18 लाख रुपये असू शकते. ही किंमती फक्त पांढऱ्या हिऱ्यांसाठी आहेत. जर हिरा गुलाबी, निळा, पिवळा, हिरवा असेल तर किंमत खूप वाढते. याशिवाय हिऱ्याची किंमत त्याच्या आकारमानावरून, कटिंग आणि पॉलिशिंगच्या तंत्रावरही ठरवली जाते. जगातील सर्वात महागडे आणि अतुलनीय हिऱ्यांची यादी 1. जगातील सर्वात महागडा हिऱ्यापैकी एक कालिनन आहे, तो 3,106 कॅरेटचा आहे. 2. सर्जियो हा हिरा देखील या यादीत आहे. हा हिरा 3,167 कॅरेटचा आहे. 3. इनकमपेरेबल हिरा, हा हिरा एका आफ्रिकन मुलीला खेळताना मिळाला, तो 890 कॅरेटचा आहे. 4. हार्ट आकारा हिरा सर्वात आकर्षक मानला जातो, जो 27.64 कॅरेट आहे. 5. एक्सेलसियर ब्लू-व्हाइट डायमंड, हा हिरा 21 तुकड्यांनी जोडून तयार केला गेला आहे, हे त्याचं खास वैशिष्ट्य देखील आहे. 6. होप डायमंड ओवल शेप हा हिरा 45.52 कॅरेटचा आहे. 7. भारतात मिळालेला कोहिनूर हिरा 105.6 कॅरेटचा आहे. जो 800 वर्ष जुना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात