हिऱ्याच्या वजनाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे 1 कॅरेट सुमारे 200 मिलीग्राम इतके असते. जर तुम्हाला वाटत असेल की हिऱ्याला तुम्ही दातांनी तोडू शकता, तर असं करणं जवळ-जवळ अशक्यच आहे. कारण आहे त्याची रचनाच. त्यामधील कार्बन पार्टीकल्स अशापद्धतीने घट्ट पकडलेले असतात की, तो दातांनी तोडणे अशक्य आहे.