जाहिरात
मराठी बातम्या / Viral / स्टंट करण्यासाठी 2 कारच्या मधून घातली दुचाकी पण...; भीषण अपघाताचा LIVE VIDEO

स्टंट करण्यासाठी 2 कारच्या मधून घातली दुचाकी पण...; भीषण अपघाताचा LIVE VIDEO

स्टंट करण्यासाठी 2 कारच्या मधून घातली दुचाकी पण...; भीषण अपघाताचा LIVE VIDEO

व्हिडिओमध्ये (Road Accident Video) पाहायला मिळतं, की बाईकवर स्टंट करण्याच्या नादात हा व्यक्ती रस्त्यावरच गाडीसह कोसळतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 03 फेब्रुवारी : सोशल मीडियावर तुम्ही स्टंटचे अनेक व्हिडिओ (Stunt Video Viral on Social Media) पाहिले असतील. अनेक लोक रस्त्यावरच स्टंट करण्यास सुरुवात करतात आणि आपल्यासोबतच इतरांनाही नुकसान पोहोचवतात. अनेकदा तर हे लोक असे स्टंट करतात की त्यात जीवही जातो. मात्र, अनेकदा ते थोडक्यात बचावतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण बाईकवर स्टंट करताना दिसतो. मात्र या नादात भयंकर अपघात होतो. या वयातही इतका जोश! म्हाताऱ्या आजीचं कृत्य पाहून तरुण नातू शॉक; VIDEO VIRAL व्हिडिओमध्ये (Road Accident Video) पाहायला मिळतं, की बाईकवर स्टंट करण्याच्या नादात हा व्यक्ती रस्त्यावरच गाडीसह कोसळतो. व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. यासोबतच तुम्हाला या तरुणाचा रागही येईल की रस्त्यावर हिरोपंती दाखवण्याची काय गरज होती. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक कार रस्त्यावर चाललेली आहे. इतक्यात एक दुचाकीस्वार तिथे येतो.

जाहिरात

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की घरांच्या बाहेर रस्त्याच्या कडेला लोकांच्या गाड्याही पार्क केल्या गेल्या आहेत. याचदरम्यान दुचाकीस्वार फूल स्पीडमध्ये स्टंट करत तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र, पुढे जे काही घडतं ते थरकाप उडवणारं आहे. तिथून निघण्याचा प्रयत्न करत असतानाच युवक दोन कारच्या मध्ये अडकतो. यानंतर धाडकन रस्त्यावरच कोसळतो. कुत्र्यापासून लहान भावाला वाचवण्यासाठी मुलाने केलेलं काम पाहून वाटेल कौतुक,VIDEO हा व्हिडिओ हॉलिवूड अभिनेता tyrese ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी युवकाला वेगवेगळे सल्ले दिले आहेत. काहींनी हा वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, हिरोपंतीच्या नादात पाय तुटला. हे कुठल्याच दृष्टीने चांगलं काम नाही

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात