जाहिरात
मराठी बातम्या / Viral / या वयातही इतका जोश! म्हाताऱ्या आजीचं कृत्य पाहून तरुण नातू शॉक; VIDEO VIRAL

या वयातही इतका जोश! म्हाताऱ्या आजीचं कृत्य पाहून तरुण नातू शॉक; VIDEO VIRAL

या वयातही इतका जोश! म्हाताऱ्या आजीचं कृत्य पाहून तरुण नातू शॉक; VIDEO VIRAL

या वयातही आजीबाई असं काही केलं जे पाहून नातू थक्क झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 फेब्रुवारी : वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशी आजीबाई व्हायरल होतो आहे, जिने असं काही करून दाखवलं आहे, ज्यामुळे तिचा नातूही थक्क झाला आहे. म्हाताऱ्या आजीचं या वयातील कृत्य पाहून तिचा नातू शॉक झाला आहे (Grandson grandmother video). व्हिडीओत पाहू शकता या आजीबाई आपल्या हातात मोबाईल घेते. तिला मोबाईलमध्ये हार्दिक पंड्या त्याच्या आजीसोबत दिसतो. हार्दिक पंड्या आणि त्याची आजी डान्स करताना दिसतात. पुष्पा (Pushpa) सिनेमातील श्रीवल्ली गाण्याची स्टेप्स ते दोघंही करत आहे. यानंतर आजीलाही असा डान्स करण्याचा मोह आवरत नाही. ती आपल्या नातवालाही आपल्यासोबत असाच डान्स करायला सांगते. तिचा जोश पाहून तिचा नातूही शॉक होतो. हे वाचा -  Shocking! पाहता पाहता अचानक जमिनीत सामावला जिवंत तरुण; थरकाप उडवणारा VIDEO आजी डान्स करण्यासाठी इतकी उत्साही असते की ती आपल्या नातवाचा एक पाय आपल्या एका हातात धरते आणि त्याला घसटत छतावर घेऊन जाते. त्यानंतर ती आपल्यामागे लटकवलेला गॉगल काढून डोळ्याला लावते. तेव्हा तर नातवाला धक्काच बसतो. त्यानंतर ती श्रीवल्ली गाण्याची डान्स स्टेप्स करायला लागते. अखेर नातवालाही तिच्यासोबत डान्स करावा लागतो.

जाहिरात

दोघंही पुष्पा फिल्ममधील श्रीवल्ली गाण्यातील अल्लु अर्जुनच्या स्टेप्सप्रमाणे स्टेप्स करताना दिसतात.  इस्टंट बॉलिवूड नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा -  …अन् ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचीच तंतरली; महिलेचा रिप्लाय पाहून स्वतःच केलं ब्लॉक आजी-नातवाचा हा ड्रामा आणि भन्नाट डान्स नेटिझन्सना आवडला आहे. ही कूल, डॅशिंग आजी सर्वांनाच आवडली आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात