जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महिलांना त्रास देणाऱ्यांनो आता सांभाळून राहा; 'या' हायटेक सँडलच्या एका फटक्यातच व्हाल गार

महिलांना त्रास देणाऱ्यांनो आता सांभाळून राहा; 'या' हायटेक सँडलच्या एका फटक्यातच व्हाल गार

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

महिलांच्या पायात असलेल्या या शस्त्राला आता हायटेक बनवण्यात आलं आहे.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 21 नोव्हेंबर : कुणी महिलांची छेड काढली, भररस्त्यात त्रास देत असेल तर महिलांजवळ सर्वात मोठं शस्त्र असतं ते त्यांच्या पायातली चप्पल. त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपल्या पायातील चप्पल काढताना आणि चोप चोप चोपतात. आता महिलांच्या या शस्त्राला आणखी हायटेक बनवण्यात आलं आहे. महिलांना त्रास देणाऱ्यांची खास धुलाई करण्यासाठीच एक सँडल तयार करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका इनोव्हेटरने महिलांची सुरक्षा लक्षात घेता त्यांच्याजवळ असलेल्या शस्त्राला हायटेक बनवलं आहे. त्यांनी एक खास सँडल तयार केली आहे.  एमआयईटी इंजिनीअरिंग कॉलेजच्या अटल इनोव्हेशन कम्युनिटी सेंटरमधील इनोव्हेटर श्याम चौरसिया यांनी ही सँडल बनवली आहे. हे वाचा -  Spy Camera: हॉटेलच्या रुममध्ये मिळाला छुपा कॅमेरा आणि कपलसोबत घडली धक्कादायक घटना या सँडलमध्ये एक बटण लावण्यात आलं आहे. हे बटण दाबताच सँडलमधून करंट येतं.  अशा सँडलचा ज्या व्यक्तीला स्पर्श होईल, त्या व्यक्तीला करंट लागेल. श्याम चौरसिया यांनी सांगितलं की, जर एखादी महिला अडचणीत असेल तर ती सँडल पायातून हातात घेऊन फक्त एक त्यावरील बटण दाबून समोरच्याला मारलं तर फक्त स्पर्शानेच समोरच्याचा करंट लागेल. या सँडलमधून दोन हजार वोल्टचा करंट येईल. सँडलमध्ये ब्लूटूथ डिव्हाइस लावण्यात आलं. सोबतच  डीसीला एसीमध्ये कन्व्हर्ट करणारं उकरणही लावण्यात आलं आहे. हे वाचा -  गिनीज बुकमध्ये महिलेच्या नावे असा रेकॉर्ड, ऐकून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य महिलांची सुरक्षा लक्षात घेता त्यांनी ही सँडल तयार केली.  यासाठी त्यांना दोन महिने लागले. या सँडलच्या पेटंटसाठी त्यांनी अप्लाय केला आहे.

या सँडलशिवाय त्यांनी अशी पर्सही तयार केली आहे. ज्यामध्ये रिव्हॉल्व्हर सारखी नळी लावण्यात आली आहे. एक बटण प्रेस करताच यातून बंदुकीच्या गोळीसारखी आवाज निघतो.  शिवाय जीपीएस सिस्टम असलेले महिलांचे दागिनेही तयार करण्यात आले आहेत. जेणेकरून दागिने चोरीला गेले तर त्याचं लोकेशन समजेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात