जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गिनीज बुकमध्ये महिलेच्या नावे असा रेकॉर्ड, ऐकून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

गिनीज बुकमध्ये महिलेच्या नावे असा रेकॉर्ड, ऐकून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

मुंबई २० नोव्हेंबर : अमेरिकेत टेक्सासमध्ये राहणार्‍या तान्या हर्बर्टच्या पावलांची नोंद गिनीज बुकात झाली आहे. कारण, तिच्या पावलांचा आकार थक्क होण्याएवढा मोठा आहे. जगातल्या कोणत्याही महिलेच्या पावलांचा आकार एवढा मोठा नाही. हर्बर्टच्या उजव्या पावलाची लांबी हा 33.1 सेंटिमीटर आहे. तसंच तिच्या डाव्या पावलाची लांबी 32.5 सेंटिमीटर आहे. म्हणजेच तिचं उजवं पाऊल 13.03 इंचांचं, तर डावं पाऊल 12.79 इंच लांब आहे. हे नक्कीच अद्भुत आहे. तान्या हर्बर्ट 18 नंबरचे शूज किंवा चप्पल वापरते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई २० नोव्हेंबर : अमेरिकेत टेक्सासमध्ये राहणार्‍या तान्या हर्बर्टच्या पावलांची नोंद गिनीज बुकात झाली आहे. कारण, तिच्या पावलांचा आकार थक्क होण्याएवढा मोठा आहे. जगातल्या कोणत्याही महिलेच्या पावलांचा आकार एवढा मोठा नाही. हर्बर्टच्या उजव्या पावलाची लांबी हा 33.1 सेंटिमीटर आहे. तसंच तिच्या डाव्या पावलाची लांबी 32.5 सेंटिमीटर आहे. म्हणजेच तिचं उजवं पाऊल 13.03 इंचांचं, तर डावं पाऊल 12.79 इंच लांब आहे. हे नक्कीच अद्भुत आहे. तान्या हर्बर्ट 18 नंबरचे शूज किंवा चप्पल वापरते. तसंच तिची उंची 6 फूट 9 इंच इतकी आहे. साधारणपणे, पाश्चात्य देशात इतकी उंची पुरुषांची असते. तुर्कीये रुमेयसा गेल्गी ही सध्या हयात असलेली जगातली सर्वांत उंच महिला आहे. तिची उंची 7 फूट 0.7 इंच इतकी आहे. तान्याची उंची तुर्कीये गेल्गीपेक्षा केवळ तीन इंचांनी कमी आहे. हे ही वाचा : पिल्लांना वाचवण्यासाठी सापाशी भिडली कोंबडी आणि मग… धोकादायक Video Viral तान्या हर्बर्टसाठी शूज किंवा चप्पल विकत घेणं हे जिकिरीचं काम आहे. कारण, 18 नंबरचे शूज मिळवण्यासाठी तिला अनेक दुकानांचे उंबरे झिजवावे लागतात. तिला दुकानात जायला आवडत नाही. टेक्सासमध्ये राहणार्‍या तान्याने पुढे खुलासा केलाय, की हायस्कूलमध्ये असतानाच तिच्या पावलांचा आकार खूप मोठा होता. परंतु, तान्या अतिशय सकारात्मक आणि पुढारलेल्या कुटुंबात वाढल्याने तिला यामुळे कधीच असुरक्षित वाटलं नाही. ती कधीच त्यामुळे काळजीत पडली नाही.

    पालकांचा होता चांगला पाठिंबा/ प्रोत्साहन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सशी बोलताना तान्या म्हणाली, ‘माझ्या आई-वडिलांनी मी मोठी झाल्यावर मला खूप प्रोत्साहन दिलं. आधार दिला. यामुळेच मी माझ्या या व्यंगाकडे कधीच नकारात्मकदृष्ट्या पाहिलं नाही. मी इतकी उंच असण्याबद्दल कुणी टीकाटिप्पणी केल्याचं मला तर आठवतही नाही. खरं तर, माझ्या मित्रमंडळींनीही नेहमीच माझी काळजी घेतली आणि मला मी जशी आहे तसं स्वीकारलं जावं यासाठी मदत केली.’ चप्पलचा आकार ठरतोय डोकेदुखी तान्या नेहमीच उंच पुरुषांसाठीचे लोफर्स किंवा टेनिस शूज विकत घ्यायची. परंतु, ते आपल्या पावलात फिट बसवण्यासाठी त्यात काही बदल तिला करावे लागत. ती म्हणाली, ‘साधारणपणे स्त्रियांना 12 किंवा 13 नंबरचा शूज घालणं अवघड जातं; पण मी मात्र 18 नंबरचे शूज घालते.’ तान्याच्या म्हणण्यानुसार, पुरुषांच्या पावलांच्या आकाराचे शूज किंवा चप्पल मिळणं सोपं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    त्या तुलनेत स्त्रियांसाठी हे केवळ अशक्य ठरतं. मोठ्या आकाराचे शूज घेताना खूप पैसे खर्च करावे लागतात. ही समस्या लक्षात घेऊन तिचं असं म्हणणं आहे की, शूज कंपन्यांनी मोठ्या आकाराचे शूज बनवणं आवश्यक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात