जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे बाप! हे असं बाळ; प्रेग्नंट महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरांनाही बसला धक्का

बापरे बाप! हे असं बाळ; प्रेग्नंट महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरांनाही बसला धक्का

(प्रतीकात्मक फोटो)

(प्रतीकात्मक फोटो)

भारतात जन्माला आलेल्या या बाळाची चर्चा सर्वत्र होते आहे.

  • -MIN READ Andhra Pradesh
  • Last Updated :

हैदराबाद, 14 फेब्रुवारी :  बाळा ची चाहूल लागताच ते कसं असेल? ते हेल्दी असेल ना?, त्याला काही समस्या तर नसेल ना? असे किती तरी प्रश्न प्रेग्नन्सी च्या कालावधीत येतात. फक्त बाळाची आई, वडीलच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला बाळाबाबत चिंता असते. ते कसं असेल हे पाहण्यासाठी त्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. असंच एक बाळ चर्चेत आलं आहे कारण त्याला पाहून चक्क डॉक्टरही शॉक झाले आहेत.

जाहिरात

आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील छिन्नमुष्टुरु गावात अशा बाळाचा जन्म झाला आहे, ज्याची चर्चा देशभर होते आहे.  तेजस्विनी नावाची ही महिला जिने अनोख्या बाळाला जन्म दिला आहे. रविवारी (12 फेब्रुवारी 2023) तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिच्या कुटुंबाने तिला गुंटाकल्लूतील सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तिची नॉर्मल डिलीव्हरी झाली. काही तासांनी जेव्हा बाळ पोटातून बाहेर आलं तेव्हा त्याला पाहताच डॉक्टर आणि रुग्णालयातील सर्व कर्मचारी हैराण झाले.

हे वाचा -  Social media ची अशीही कमाल! Whatsapp मुळे जन्माला आलं बाळ

कारण हे बाळ सामान्य बाळांपेक्षा खूपच वेगळं होतं. या महिलेने साध्यासुध्या नव्हे तर बाहुबली बाळाला जन्म दिला होता. तिच्या पोटी बाहुबलीच जन्माला आला. सामान्यपणे बाळ जन्माला येतं, तेव्हा त्याचं वजन फार फार तर अडीच ते साडेतीन किलो असतं.  पण या बाळाचा वजन सामान्य वजनापेक्षा दुप्पट, तिप्पट आहे. तुम्हाला आकडा वाचूनच चक्कर येईल या बाळाचं वजन 5 किलो 80 ग्रॅम म्हणजे तब्बल  6 किलो आहे. डॉक्टरांनी जेव्हा या बाळाला पाहिलं तेव्हा तेसुद्धा हैराण झाले.

जाहिरात
News18लोकमत
News18लोकमत

महिलेचं हे तिसरं मूल डॉक्टरांनी सांगितलं की आई आणि बाळ दोघंही स्वस्थ आहेत. तीन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.  सामान्य वजनापेक्षा बाळाचं वजन जर साडेतीन किलोपेक्षा जास्त असेल तर आई आणि बाळाच्या सुरक्षेसाठी म्हणून सिझेरियन डिलीव्हरी केली जाते. पण हे बाळ नैसर्गिक प्रसूतीने जन्माला आलं त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

जाहिरात

हे वाचा -  OMG! महिलेने दिला अशा बाळाला जन्म, डॉक्टरही शॉक; जन्मताच झाला रेकॉर्ड

जगातील सर्वात वजनदार बाळाचा विचार करता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार आतापर्यंत जगातील सर्वात वजनदार बाळ 1955 साली इटलीमध्ये जन्माला आलं होतं. त्याचं वजन 10.2 किलो होतं. तुमच्या माहितीत असं वजनदार बाळ असेल तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात