कोंबडी आणि बकरीच्या मैत्रीचा हा व्हिडीओ चर्चेत आहे. त्यांच्यातील मैत्री पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं आहे. हे वाचा - बापरे! पाहता पाहता जिवंत हरणाला संपूर्ण गिळलं; अजगराने केलेल्या शिकारीचा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी काही कोंबडी आणि बकरी दिसत आहेत. अचानक आकाशातून जमिनीच्या दिशेला झेपावत एक ससाणा पक्षी येतो. तो कोंबडीच्या पिल्लावर हल्ला करतो. त्या पिल्लाला घेऊन तो उडणार इतक्यात पिल्लाची आई म्हणजे कोंबडी तिथं धावत येते. ती आपल्या पिल्लाला ससाण्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करते. कोंबडीला आणि तिच्या पिल्लाला संकटात पाहून तिथं एक बकरी धावत येते. तीसुद्धा ससण्याला भिडते. कोंबडीच्या पिल्लासाठी बकरी ससाण्याशी लढते. कोंबडी आणि बकरी दोघं मिळून ससण्याशी दोन हात करतात. अखेर ससाण्याचे पिल्लाला पळवण्याचे प्रयत्न अयशस्वी होतात. ससाणा कोंबडीच्या पिल्लाला तिथं सोडतो आणि आकाशात पुन्हा उडून जातो. हे वाचा - VIDEO - तडफडत होतं इवलं बदक; कुत्र्याच्या पिल्लाने जे केलं ते पाहून व्हाल भावुक @buitengebieden_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या कोंबडी आणि बकरीची अनोखी मैत्री सर्वांना आवडली आहे.Goat and rooster saving chicken from hawk attack.. pic.twitter.com/IlgL4jy2CP
— Buitengebieden (@buitengebieden_) September 15, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chicken, Viral, Viral videos