मुंबई, 28 जानेवारी : सर्वसामान्यपणे पाणी आणि कोळश्याच्या मदतीने वीजनिर्मिती केली जाते, हे आपण जाणतो. याशिवाय वाऱ्याच्या साह्यानेही वीजनिर्मिती होते. याला पवनऊर्जा असं म्हटलं जातं; पण सध्या दक्षिण आफ्रिकेत आढळणारे खडक वीज निर्माण करू शकतात, असा दावा केला जात आहे. हे खरंच शक्य आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, तज्ज्ञांनी यावर मत व्यक्त केलं आहे. हा दावा नेमका काय आहे, ते जाणून घेऊ या.
प्राचीन काळी दगड एकमेकांवर घासून आग पेटवली जात असं आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलं आहे. सध्याच्या काळात काड्यापेटी असूनही, काही ठिकाणी होमहवनासाठी या पारंपरिक पद्धतीने अग्नि प्रज्वलित केला जातो. यज्ञासाठी लाकडी यंत्रापासून अग्नी निर्माण करण्याकरिता ज्या यंत्राचा वापर केला जातो त्याला अरणी असं म्हणतात. भारतात पूर्वी आग पेटवण्यासाठी ही पद्धत वापरली जात असे. बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र शास्त्री यांनी या पद्धतीचा वापर करून अग्नी प्रज्वलित केल्याने त्यांची देशभरात चर्चा झाली. मात्र आता दक्षिण अफ्रिकेतील कांगो देशाने एक विचित्र दावा केला आहे. आफ्रिकेतल्या खडकातून वीजनिर्मिती होऊ शकते, असा दावा सध्या केला जात आहे. यामुळे एक बल्ब तर लागेलच; पण आफ्रिका खंडातल्या सर्व देशांमधल्या विजेची समस्या दूर होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. या संदर्भातला व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : आधुनिक पुंडलिक : हे 6 भाऊ-बहीण राहिले अविवाहित! कारण वाचून म्हणाल कलयुगात कसं आहे शक्य?
`बीबीसी`मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, या संदर्भातला एक व्हिडिओ पाहिल्यानंतर शास्त्रज्ञांनी अशा प्रकारे वीज उत्पादनास नकार दिला आहे. त्याचप्रमाणे एडिंबरा युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ जिओसायन्सेसचे प्राध्यापक स्टुअर्ट म्हणतात की `खडकांच्या घर्षणामुळे घरातल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी वीज निर्माण होऊ शकते, याविषयी मला शंका आहे. काही जणांना हा दावा खरा वाटतो तर फॅक्ट चेकमध्ये याबाबत पुष्टी होऊ शकलेली नाही.`
Electrically charged stones discovered in the Democratic republic of Congo, now more trouble coming, cry my beloved Africa. pic.twitter.com/6aa6Iz2sSp
— Daniel Marven (@danielmarven) January 21, 2023
दरम्यान, या व्हिडिओच्या माध्यमातून दोन दगड घासून वीजनिर्मिती केली जात असल्याचा दावा जगभरात व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या अकाउंट्स वरून शेअर होत असलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन जगातल्या काही शास्त्रज्ञांच्या निर्दशनास ही बाब आणून दिली गेली आहे.
वाचा - धीरेंद्र शास्त्रींचे सत्य काय? देवघरचे पुरोहित म्हणतात, सर्वात मोठा चमत्कारी इथे
याबाबत प्रा. स्टुअर्ट म्हणाले, `ज्या दगडांच्या घर्षणाने ठिणगी पडत आहे ते दगड लोकांनी हातात धरले आहेत. या लोकांच्या हातात हातमोजे आहेत. या हातमोज्यांमध्ये एखादी वस्तू लपवली असण्याची शक्यता आहे. धातूची उत्पादनं चांगली वाहक असतात. त्यामुळे हातमोज्यांमधून जात असलेली वीज ठिणगीच्या रूपात दिसणं शक्य आहे. कांगोतल्या त्या भागात लिथियमचा मोठा साठा आहे. त्यामुळे दगडांच्या घर्षणातून वीजनिर्मितीचा हा दावा अनेक लोकांना खरा वाटत आहे; पण फॅक्ट चेकमध्ये याला दुजोरा मिळालेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Electricity, Viral