मुंबई, 07 जुलै : बिझनेसमन हर्ष गोयंका सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. काही ना काही व्हिडीओ ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. असाच एक व्हिडीओ त्यांनी सध्या त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे. त्यांच्या घराबाहेरील हे दृश्य आहे. जे पाहून हर्ष गोयंकाही शॉक झाले. त्यांनी ट्विटरवर ही पोस्ट केली आहे. हर्ष गोयंका यांनी ट्विटमध्ये सांगितल्यानुसार त्यांना घराबाहेरून आवाज येत होता. लहान मुलांसारखा हा आवाज होता. म्हणून ते पाहण्यासाठी घराबाहेर आले. तर तिथं लहान मुलं नव्हतीच. पण तो आवाज मात्र येत होता. लहान मुलांचा तो आवाज लहान मुलांचा नव्हे तर भलत्याचाच होता. कानाने आवाज ऐकल्यानंतर डोळ्यांनी ते दृश्य पाहिल्यावर गोयंका शॉकच झाले. VIRAL VIDEO - सिंहिणीच्या डरकाळीनेच सिंहाला फुटला घाम; छाव्यांची शिकार करायला आला, पण धूम ठोकून पळाला व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन मांजरी आमनेसामने आहेत. मांजरी एकमेकींसोबत भांडत आहेत, गुरगुरत आहेत. डोळे बंद करून त्यांचा आवाज ऐकला तर लहान मुलंच भांडत आहेत असंच वाटतं. त्यामुळे आधी आवाज ऐकून मग दृश्य पाहिल्यावर साहजिकच यावर विश्वास बसत नाही. कुणालाही आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. गोयंका यांनी व्हिडीओ पोस्ट करताना त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “काल संध्याकाळी, माझ्या घराच्या बाहेर जोपर्यंत मी या दोन मांजरींना एकमेकांशी बोलतांना पाहिलं नाही, तोपर्यं मला वाटलं की मी काही लहान मुलांना भांडताना ऐकतो आहे. अद्भुत” VIRAL VIDEO - खेळता खेळता चिमुकल्याने पिटबुलच्या डोक्यात मारली बाटली; पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहूनच भरेल धडकी ही पोस्ट पाहिल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. दोन टॉम म्हणजे मांजरी भिडताना पाहणं खरंच मजेदार आहे, अशा प्रतिक्रिया बहुतेकांनी दिल्या आहेत.
Yesterday evening, just outside my home I thought I heard some young kids blabbering until I saw these two cats talking to each other. Amazing! pic.twitter.com/skhsLJ5Ot0
— Harsh Goenka (@hvgoenka) July 6, 2023
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आणि हर्ष गोयंका यांच्याप्रमाणे मांजरांचा आवाज मुलांच्या आवाजासारखं वाटणं, असं कधी तुमच्यासोबत झालं होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.