जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पावसात भिजणाऱ्या कुत्र्याच्या मदतीला धावून आला गार्ड; मनाला स्पर्शून जाणारा Photo Viral

पावसात भिजणाऱ्या कुत्र्याच्या मदतीला धावून आला गार्ड; मनाला स्पर्शून जाणारा Photo Viral

पावसात भिजणाऱ्या कुत्र्याच्या मदतीला धावून आला गार्ड; मनाला स्पर्शून जाणारा Photo Viral

मनाला स्पर्श करून जाणारा हा फोटो हर्ष गोयनका यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. फोटोला त्यांनी अतिशय सुरेख कॅप्शन दिलं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 19 ऑक्टोबर : प्रसिद्ध व्यवसायिक हर्ष गोयनका (Harsh Goenka) सोशल मीडियावर (Social Media) भरपूर सक्रीय असतात. त्यांचे फॉलोअर्सही भरपूर आहेत. हर्ष गोयनका सोशल मीडियावर अनेकदा मजेशीर आणि प्रेरणादायक व्हिडिओ शेअर करत असतात. लोकांना त्यांची प्रत्येक पोस्ट आवडते. नुकतंच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दिसतं, की एक कुत्रा पावसात भिजत आहे. पुतिन यांची मुलाखत घेताना महिला अँकरने केलं विचित्र कृत्य; देशभरात गोंधळ एक गार्ड आपल्या हातातील छत्रीखाली या कुत्र्याला बसवतो आणि स्वतःही त्याच छत्रीच्या खाली बसतो (Viral Photo of Dog and Guard). हा फोटो नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा फोटो पाहून आपल्याला धडा मिळतो, की माणूस असो किंवा प्राणी आपण सर्वांचीच मदत करायला हवी.

जाहिरात

मनाला स्पर्श करून जाणारा हा फोटो हर्ष गोयनका यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. फोटोला त्यांनी अतिशय सुरेख कॅप्शन दिलं आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, सुगंध नेहमी त्या हातात राहतो, जो गुलाब देतो. दयाळू बना. फोटोमध्ये तुम्ही पाहा कशाप्रकारे गार्ड कुत्र्यावर आपली छत्री पकडून त्याच्या जवळ बसला आहे. जेणेकरून कुत्रा पावसात भिजू नये. 6 महिन्यांपासून पोटात होता मोबाईल; युवकाला कल्पनाही नव्हती, डॉक्टरही शॉक सोशल मीडियावर या फोटोला भरपूर पसंती मिळत आहे. हा फोटो आतापर्यंत 1 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. लोक या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं लिहिलं, भारतात पॉझिटिव्ह आणि नातेवाईक दोन प्रकारचे असतात. जवळच्या लोकांवरही प्रेम करा. दुसऱ्या लिहिलं, की मला वाटतं सर्वांना शक्य तितकं दयाळू होता आलं पाहिजे. जर तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला/प्राण्याला दुखावले असेल तर सर्वोत्तम दान आणि सद्भावना म्हणून दया दाखवणे हे महत्त्वाचे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात