मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

राष्ट्रपती पुतिन यांची मुलाखत घेताना महिला अँकरने केलं विचित्र कृत्य; देशभरात उडाला गोंधळ

राष्ट्रपती पुतिन यांची मुलाखत घेताना महिला अँकरने केलं विचित्र कृत्य; देशभरात उडाला गोंधळ

एक अमेरिकन महिला अँकर (US Female Anchor) रशियात चर्चेचा विषय बनली आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधताना तिने केलेली कृती, हावभाव चर्चेचा विषय ठरले आहेत.

एक अमेरिकन महिला अँकर (US Female Anchor) रशियात चर्चेचा विषय बनली आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधताना तिने केलेली कृती, हावभाव चर्चेचा विषय ठरले आहेत.

एक अमेरिकन महिला अँकर (US Female Anchor) रशियात चर्चेचा विषय बनली आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधताना तिने केलेली कृती, हावभाव चर्चेचा विषय ठरले आहेत.

मॉस्को 19 ऑक्टोबर : नागरिकांची प्रत्येक अडचण तसेच सामान्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रसार माध्यमे करतात. कोणतीही विश्रांती न घेता त्यांचे हे काम अविरतपणे सुरु असते. तुम्ही टीव्ही पाहता ते अँकर्ससुद्धा मोठी मेहनत घेतात. प्रत्येक बातमी सोप्या आणि सहज भाषेत सांगण्याचे काम हे अँकर्स करतात. मात्र, सध्या एक अमेरिकी महिला अँकर रशियामध्ये (Russia) चांगलीच चर्चेत आली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यासोबत संवाद साधताना संबंधित अँकरने दिलेल्या विचित्र हावभावांमुळे (Weird Expressions of Female Anchor) ती चर्चेत आली आहे. झी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.

एक अमेरिकन महिला अँकर (US Female Anchor) रशियात चर्चेचा विषय बनली आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधताना तिने केलेली कृती, हावभाव चर्चेचा विषय ठरले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या मते संबंधित अँकरने पुतिन यांची मुलाखत लाइव्ह चालू असताना स्वतःला ‘सेक्स ऑब्जेक्ट’ म्हणूनच सादर करण्याचा प्रयत्न केला. या अँकरचे नाव हेडली गॅम्बल (Hadley Gamble) असं असून ती सीएनबीसीमध्ये काम करते. मॉस्कोमध्ये आयोजित एका कार्यक्रमात या अँकरने पुतिन यांच्यासोबत संवाद साधताना विचित्र हावभाव दिले.

काय ही विचित्र अट! इथं राहायचंय तर 'या' वेळेला अंघोळ करायला सक्त मनाई

'डेली मेल'च्या वृत्तानुसार,' एनर्जी फोरम'च्या एका कार्यक्रमात पुतिन उपस्थित होते. यावेळी, सीएनबीसीच्या हेडली गॅम्बलने राष्ट्रपतींना प्रश्न विचारला, व पुतिन बोलत असताना गॅम्बल तिचे पाय विचित्रपणे हलवत राहिली. अनेकवेळा तिने थेट राष्ट्रपतींकडे पाय केले. एवढंच नाही तर तिने जीभ बाहेर काढून इशारे केले, जे अशोभनीय आणि कामुक होते. या सर्व प्रकारावर रशियन माध्यमांचं म्हणणं आहे की, अमेरिकेच्या अँकरने स्वत:ला सेक्स ऑब्जेक्ट म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला.

तर, पुतिन यांचे प्रवक्ते (Propagandist) व्लादिमीर सोलोव्योव्ह यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, सीएनबीसीच्या हेडली गॅम्बल यांनी राष्ट्रपतींचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. हेडलींचं वर्तन अस्वीकारार्ह आहे. त्यांची कृती पाहून असं वाटत होतं की ती स्वतःला राष्ट्रपतींसमोर ‘सेक्स ऑब्जेक्ट’ म्हणून प्रेझेंट करते आहे. या कृत्यांमुळे तिच्यावर टीका होऊ शकते, याची सुद्धा तिला भीती वाटली नाही. या संदर्भात सीएनबीसी आणि हेडलीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हनीमूनसाठी जाणं या कपलला पडलं महागात; 100 वर्षांपूर्वी जमिनीत पुरलेला बाँब फुटला

हेडली गॅम्बलने वर्तमानपत्रात छापलेला स्वत:चा एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिचे विचित्र हावभाव दिसून येतात. या फोटोला तिने 'माय बेस्ट अँगल' अशी कॅप्शन दिली आहे. हेडलीने पुतिन यांना युरोप गॅस संकटाबद्दल प्रश्न विचारला होता. जेव्हा पुतिन यांनी यावर बोलायला सुरुवात केली, तेव्हा हेडलीने विचित्र हावभाव दिले.

महिला अँकरच्या अशा वागण्यामुळे मात्र रशियामध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. संबंधित महिला अँकरवर रशियातील स्थानिक माध्यमांसोबतच इतरांकडून टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता संबंधित महिला अँकर काम करत असलेली वृत्तवाहिनी काय भूमिका घेते ? याकडे लक्ष लागले आहे.

First published:

Tags: President Vladimir Putin, Russia's Putin, Talk show